Pune Gram Panchayat Election : प्रचार केला पण वाया गेला, मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या उमेदवाराचा शिंदे गटाकडून पराभव
Pune Gram Panchayat Election : पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल पाहता सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना त्यांच्या मतदारसंघात अनेक ठिकाणी धक्के बसलेत.
![Pune Gram Panchayat Election : प्रचार केला पण वाया गेला, मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या उमेदवाराचा शिंदे गटाकडून पराभव Pune Gram Panchayat Election dilip walse patil lost eelection in nirgudsar village pune gram panchayat election Pune Gram Panchayat Election : प्रचार केला पण वाया गेला, मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या उमेदवाराचा शिंदे गटाकडून पराभव](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/06/5aeeba76f3850845a173d364237c63d81699256722872442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल (Dilip walse patil) पाहता सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना त्यांच्या मतदारसंघात अनेक ठिकाणी धक्के बसलेत. स्वतःच्या गावात दिलीप वळसे पाटील यांनी प्रचार करूनही त्यांचा संतोष टावरे हा सरपंच पदाचा उमेदवार पराभूत झाला आहे. तर रवींद्र वळसे पाटील हा शिंदे गटाचा उमेदवार सरपंच म्हणून निवडून आला आहे. त्याचबरोबर दिलीप वळसे पाटील यांच्या राजकारणाचे केंद्रस्थान असलेला भीमाशंकर सहकारी साखर कारखाना ज्या पारगाव गावामधे आहे. त्या पारगावमधे वळसे यांच्या गटाचा सरपंच पदाच्या उमेदवार अर्चना ढोबळे पराभूत झाल्यात. तर शरद पवार गटाच्या श्वेता ढोबळे या सरपंच बनल्या आहे.
पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून जिह्यातील ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. मात्र यावर्षी या निकालात बदल दिसून येत आहे. कार्यकर्त्यांमध्येही वेगळेपणा जाणवत आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर किंवा सत्ता संघर्षानंतर मोठा बदल दिसून येत आहे. शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडलेले पाहायला मिळाले. दिलीप वळसे पाटलांकडे शरद पवारांचे मानस पूत्र म्हणून पाहिलं जातं. सत्ता संघर्षानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे. मात्र या निव़डणुकीत वळसे पाटलांचा दारुण पराभव झाला आहे.तर शरद पवार गटाने बाजी मारली आहे.
जुन्नरमध्ये ठाकरे गटाची बाजी, अमोल कोल्हेंना धक्का
जुन्नर तालुक्यातील खासदार अमोल कोल्हे यांच्या नारायणगावात राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला आहे. नारायणगाव ग्रामपंचयात मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सत्ता कायम राखली आहे. 17 पैकी 16 उमेदवार विजयी झाले असून सरपंच पद हे ठाकरे गटाकडे गेले आहे.
शिरुरमध्ये अजित पवार गट विजयी, शरद पवारांना मोठा धक्का
त्यासोबतच पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या रांजणगाव ग्रामपंचायतवरती अजित पवार गटाचं वर्चस्व आहे. 13 जागांसह सरपंच पदावरदेखील अजित पवार गटाने वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. शिरुरमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. केवळ 3 जागांवरतीच शरद पवार गटाला समाधान मानावे लागले आहे. पुणे जिल्ह्यात बाकी ग्रामपंचायती नेमक्या कोणाच्या ताब्यात जातात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)