एक्स्प्लोर
पुण्यात 4 वर्षांच्या भावासमोर आठवीच्या विद्यार्थिनीचा गळफास
जास्त घराबाहेर फिरु नकोस, घरातच अभ्यास कर असं आई-वडील तिला वारंवार सांगायचे. याच रागातून तिने टोकाचं पाऊल उचललं
पुणे : घराबाहेर पडू नकोस, म्हणून पालक वारंवार ओरडत असल्याचा राग मनात धरुन आठवीतील चिमुरडीने टोकाचं पाऊल उचललं आहे. पुण्यात राहणाऱ्या 14 वर्षांच्या विद्यार्थिनीने चार वर्षांच्या भावाच्या देखत गळफास लावून आत्महत्या केली.
14 वर्षांची विद्यार्थिनी आई-वडील आणि धाकट्या भावासह पुण्यातील हडपसरमध्ये आदर्शनगर माळवाडीत राहायची. जास्त घराबाहेर फिरु नकोस, घरातच अभ्यास कर असं आई-वडील तिला वारंवार सांगायचे. मात्र ती त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होती.
रविवारी आई वडील तिला आणि तिच्या चार वर्षांच्या भावाला घरात ठेवून सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले. दुपारी तिने आपल्या धाकट्या भावादेखतच घरातील छताला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीय दुपारी घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. तिचे वडील मार्केट यार्डमध्ये टेम्पोवर काम करतात, तर आई गृहिणी आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement