एक्स्प्लोर

बिहार निवडणूक निकाल 2025

(Source:  ECI | ABP NEWS)

GBS : पुण्यात जीबीएसचा पहिला बळी, सिंहगड परिसरातील 56 वर्षीय महिलेचा मृत्यू

Guillain Barre Syndrome : जीबीएसची लागण झाल्यानंतर या महिलेला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता तिचा मृत्यू झाला आहे.

पुणे : शहरात जीबीएसमुळे पहिला बळी गेला असून सिंहगड परिसरात राहणाऱ्या 56 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत महिला ही कॅन्सरग्रस्त होती.15 जानेवारी रोजी ससून रुग्णालयात त्या महिलेला दाखल करण्यात आले होते. आता तिचा मृत्यू झाला आहे. याआधी जीबीएस रुग्णामुळे सोलापूर येथील एकाचा मृत्यू झाला होता. 

राज्यातील तसेच पुणे विभागातील जीबीएसमुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे. पुण्यात सध्या जीबीएसचे 127 रुग्ण आहेत. त्यांच्यावर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत.

पुण्यात केंद्राच्या पथकाची पाहणी

गुइलेन-बॅरे सिंड्रोमचा (GBS) पुण्यात उद्रेक झाल्याचं दिसून येत असून जिल्ह्यातील बाधित गावांत सध्या भीतीचे वातावरण आहे. पुण्यातील विविध भागात जीबीएसचे रुग्ण आढळले असून त्याची  गंभीर दाखल आता केंद्राने घेतली आहे. केंद्राच्या सात सदस्यीय पथकानं 29 जानेवारी रोजी पुण्यातील नांदेड गावात भेट देत त्या ठिकाणच्या विहिरीतील पाण्याची पाहणी केली. 

केंद्रीय पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (दिल्ली), निम्हान्स (बंगळुरू), पुण्यातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागीय कार्यालय आणि राष्ट्रीय विषाणुविज्ञान संस्था (एनआयव्ही) या संस्थांमधील सात तज्ज्ञांचा समावेश होता. 

दुसरीकडे संभाव्य परिस्थिती आटोक्यात राहावी यासाठी प्रशासनाकडूनही खबरदारी घेण्यात येत आहे. मात्र GBS च्या रुग्णांवर मोफत उपचारांसाठी नेमलेल्या कमला नेहरू रुग्णालयात एकही न्यूरोलॉजिस्ट नसल्याचे पुढे आल्याने एकच खळबळ उडाली आहे.   

गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) हा ऑटोइम्युन आजार असून तो प्रामुख्याने व्हायरल इन्फेक्शननंतर काही आठवड्यांत होतो. मात्र त्यावर उपचार उपलब्ध असल्याने लोकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. 

काय काळजी घ्यावी?

  • पाणी उकळून व गाळून प्यावे.
  • उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.
  • अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे.

कॅम्पिलोबॅक्टरमुळे जीबीएस कसा होतो?

  • दूषित पाणी किंवा अन्न खाल्यावर कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग होऊ शकतो.
  • संसर्गामुळे अतिसार आणि ओटीपोटात वेदना होऊ शकतात.
  • काही व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती मज्जातंतूंना लक्ष्य करते. ज्यामुळे १ ते ३ आठवड्यांच्या आत जीबीएसचे निदान होते.
  • याशिवाय, डेंग्यू, चिकनगुनियाचे विषाणू किंवा इतर बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे मज्जातंतूंविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती हल्ला करते.

कॅम्पिलोबॅक्टर संसर्गाची लक्षणे

  • अतिसार
  • पोटदुखी
  • ताप
  • मळमळ किंवा उलट्या 

ही बातमी वाचा: 

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election Result 2025: नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
Bihar Election Result 2025: बिहारमधील दारुण पराभवानंतर राहुल गांधी थेट मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी पोहोचले; दोन आठवड्यात पुरावे मांडणार
बिहारमधील दारुण पराभवानंतर राहुल गांधी थेट मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी पोहोचले; दोन आठवड्यात पुरावे मांडणार
खळबळजनक! प्राणी संग्रहालयातील 28 काळविटांचा अचानक मृत्यू; वनमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
खळबळजनक! प्राणी संग्रहालयातील 28 काळविटांचा अचानक मृत्यू; वनमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pimpri NCP: पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका-पुतण्यांची आघाडी होणार? की काँग्रेस, शिवसेना बिघाडी करणार?
Mumbai Gundawali Metro : गुंदावली मेट्रो स्टेशनवर आढळली बेवारस संशयास्पद बॅग; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Kothrud Girl Case : मुलींना शिवीगाळ करणाऱ्या मुलींना सस्पेंड करा, प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Ahilyanagar Leopard : आता गळ्यात पट्टे घालून फिरावं का? बिबट्याच्या हल्ल्यात वाढ, गावकऱ्यांचा संताप
Faridabad Big Breaking : फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा नौगाममध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election Result 2025: नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
Bihar Election Result 2025: बिहारमधील दारुण पराभवानंतर राहुल गांधी थेट मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी पोहोचले; दोन आठवड्यात पुरावे मांडणार
बिहारमधील दारुण पराभवानंतर राहुल गांधी थेट मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी पोहोचले; दोन आठवड्यात पुरावे मांडणार
खळबळजनक! प्राणी संग्रहालयातील 28 काळविटांचा अचानक मृत्यू; वनमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
खळबळजनक! प्राणी संग्रहालयातील 28 काळविटांचा अचानक मृत्यू; वनमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
Home :  स्वप्नातील घर खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टींवर लक्ष ठेवा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता
नवं किंवा जुनं घर, दुकान खरेदी करण्यापूर्वी या गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा मोठा फटका बसण्याची शक्यता
...तर पिंपरी चिंचवडच्या 128 जागा स्वबळावर लढणार; श्रीरंग बारणेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला इशारा
...तर पिंपरी चिंचवडच्या 128 जागा स्वबळावर लढणार; श्रीरंग बारणेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला इशारा
Bihar Election Result 2025: बिहार निवडणुकीत राजदच्या दारुण पराभवानंतर लालू यादवांच्या कुटुंबात वादळ! बापासाठी किडनी दिलेल्या लेकीचा तडकाफडकी निर्णय
बिहार निवडणुकीत राजदच्या दारुण पराभवानंतर लालू यादवांच्या कुटुंबात वादळ! बापासाठी किडनी दिलेल्या लेकीचा तडकाफडकी निर्णय
Gold Rate : सोन्याचे दर 3300 रुपयांनी घसरले, चिंता करु नका दरात 20 टक्क्यांची तेजी येण्याची शक्यता, तज्ज्ञ म्हणतात... 
सोन्याच्या दरात पुन्हा तेजी येणार, सोने दरात आणखी 20 टक्क्यांची तेजी, तज्ज्ञांनी काय सांगितलं?
Embed widget