एक्स्प्लोर

Pune ganeshotsav 2023 : मिरवणूक बघत होता, सेल्फीही काढला अन् अचानक हौदात पडला; चार वर्षीय अर्णवचा करुण अंत

पिंपरी- चिंचवडमधील मोशी येथे गणपती विसर्जन सुरू असताना चार वर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. 

पुणे : पिंपरी- चिंचवडसह महाराष्ट्रात (Pune Crime News) गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडलं. गणपती बाप्पांना पाणवलेल्या डोळ्यांनी गणेश भक्तांनी निरोप दिला. असं असताना पिंपरी- चिंचवडमधील (Pune Ganeshotsav 2023)मोशी येथे गणपती विसर्जन सुरू असताना चार वर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अर्णव आशिष पाटील या चार वर्षीय मुलाचं नाव आहे.

मोशीतील मंत्रा सोसायटी या ठिकाणी काल सायंकाळी घटना घडली. अर्णव हा सोसायटीमधील गणपती विसर्जन टाकीच्या शेजारी उभा राहून बघत होता. लेझीमच्या ठेक्यावर सोसायटीतील सदस्य नाचत असताना अचानक अर्णव हा टाकीत पडला हे कोणाच्याच लक्षात आलं नाही. यासंबंधीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. अर्णव सोबतचा सेल्फी देखील पुढे आला असून तो शेवटचा ठरला. काल पुण्यात सगळीकडे गणेशोत्सवाची धामधुम सुरु होती. अनेकांनी ढोल ताशावर ठेका धरला होता. बाप्पाला निरोप देण्यासाठी सगळेच एकत्र आले होते. रस्त्यांवर जल्लोष दिसत होता. याच जल्लोषात पाटील यांचं कुटुंबदेखील बाप्पाला निरोप देत होतं. त्यावेळी मुलगाही नाचत होता आणि टाकीत पडला आणि मुलानंच निरोप घेतला. 

डॉल्बीच्या आवाजानं धडधड वाढली अन् थेट खाली कोसळला...

हिंजवडी येथील एका 23 वर्षीय तरुणाचा गणपती विसर्जन मिरवणुकीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. योगेश अभिमन्यू साखरे असे मृताचे नाव असून तो हिंजवडी येथील रहिवासी आहे. तो हनुमान तालीम मित्र मंडळाशी संबंधित होता. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास तो हिंजवडीजवळ मिरवणुकीत सहभागी झाला होता. त्यावेळी त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्याने औषध खरेदी करण्यासाठी मेडिकल स्टोअरमध्ये धाव घेतली तिथेच तो कोसळला. ही परिस्थीती पाहू स्थानिकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आणि गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्यांना औंध रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आलं.

अति उत्साह अन् आवाज जीवावर बेतले...

राज्यात जल्लोषात गणेशोत्सव 10 दिवस पार पडला मात्र शेवटच्या दिवशी या गणेशोत्सवाला आवाजामुळे आणि अति उत्साही कार्यकर्त्यांमुळे गालबोट लागलं. सध्या सगळ्या मंडळांमध्ये आवाजात आणि डॉल्बी सिस्टिमवरुन स्पर्धा दिसून येते. कोणाचा आवाज मोठा यावरुन अनेकदा वाद बघायला मिळतो. मात्र हाच आवाज अनेकांचा जीव घेत असल्याचं मागील काही वर्षांत घडलेल्या घटनांमधून समोर आलं आहे.

 हेही वाचा-

Pune ganeshotsav 2023 : पुण्यात पोलिसांचा वचक नाहीच? गणेश मंडळांचा मनमानी कारभार सुरुच; तब्बल 22 उलटूनही 200 पेक्षा जास्त मूर्तींचं विसर्जन बाकी

महत्त्वाच्या बातम्या

Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Embed widget