(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Food and Drug Administration Action: पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 150 लीटर भेसळ युक्त तूप जप्त
या कारवाईत 150 लिटर भेसळ युक्त तुप सापडले आहे. कात्रज भागात पोलिसांनी एका गोडाऊनवर छापा टाकत 150 लिटर भेसळयुक्त तूप जप्त केले आहे.
Pune Food and Drug Administration Action: पुण्यात ऐन राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने (Department of Food and Drug Administration) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 150 लिटर भेसळ युक्त तुप सापडले आहे. कात्रज भागात पोलिसांनी एका गोडाऊनवर छापा टाकत 150 लिटर भेसळयुक्त तूप जप्त केले आहे.
अन्न व औषध प्रशासनासोबत मंगळवारी पुणे पोलिसांनी कारवाई ही कारवाई केली आहे. याप्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे मोहिंदर सिंग देवरा असे या व्यक्तीचे नाव असून तो डालडा जे वनस्पती तूप म्हणून ओळखल्या जाते आणि जेमिनीचे तेल एका केमिकलच्या साह्याने एकत्र करून त्यावर प्रक्रिया करत भेसळ करायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी केलेल्या कारवाई त त्याच्याकडून अनेक केमिकल देखील जप्त करण्यात आले असून त्याच्या टेस्टिंगसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आलेले आहेत. कारवाईमध्ये तब्बल 1 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. देवरा यांनी हे भेसळयुक्त तुप कुठल्या दुकानदारांना विकले आहे याची चौकशी सध्या सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त पदार्थ विकणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. याआधी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ घरांवर धाडी टाकुन 2 लाख 19 हजार 600 रुपये किंमतीचा सुमारे 7 हजार 313 किलो भेसळयुक्त गुळ तर 83 हजार 440 रुपये किंमतीची 2 हजार 750किलो भेसळयुक्त साखर जप्त केली होती. चॉकलेट, भेसळयुक्त गुळ व साखर वापरणाऱ्या गुळ उत्पादकावर अन्न व औषध प्रशासनातर्फे कारवाई करण्यात येत आहे. जानेवारी 2022 मध्ये दोन गुळ उत्पादकावर धाडी टाकून 3 लाख 67 हजार 900 रुपये किंमतीचा सुमारे 7 हजार 162किलो गुळाचा साठा जप्त करण्यात आला होता. जप्त केलेली साखर नष्ट केली आहे.