एक्स्प्लोर

Pune Fire : पुणे रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या एका डब्याला भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही!

 पुणे रेल्वे जंक्शन यार्डातील एका रिकाम्या डब्याला आग लागली. या घटनेत आजूबाजूच्या इतर दोन डब्यांचेही नुकसान झालं आहे.

पुणे :  पुणे रेल्वे जंक्शन (Pune Railway) यार्डातील एका रिकाम्या (Pune Fire News) डब्याला आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, या घटनेत आजूबाजूच्या इतर दोन डब्यांचेही नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या चार गाड्या (Pune news) आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण अजून समजू शकलेलं नाही. ही घटना 13 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 1 वाजून 58 मिनिटांनी घडली. 

कंप्रेसर रूम क्रमांक 4 रेल्वेजवळ ही घटना घडली असून परिसरात असलेल्या तीन डब्यांपैकी एका डब्याला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. अनेक दिवसांपासून हे डबे या ठिकाणी पडून आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी आधी वीजपुरवठा खंडित केला आणि त्यानंतर आग आटोक्यात आणण्यास सुरुवात केली. 30  मिनिटांत आग विझवण्यात आली. दरम्यान, रेल्वे कर्मचाऱ्यांनी इतर दोन डबे सुरक्षित स्थळी आणले. विजय भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाच्या 20 जवानांनी आग आटोक्यात आणली.

नेमक काय घडलं?

घटनास्थळी पोहोचताच ठिकाणी क्वीन्स गार्डनच्या पाठीमागील बाजूकडे (कॉम्प्रेसर रुमनजीक) क्रमांक चार रेल्वे मार्ग येथे बऱ्याच दिवसापासून उभ्या स्थितीत असलेल्या रेल्वेच्या तीन डब्ब्यापैंकी मधल्या एका डब्ब्याला आग लागल्याचे निदर्शनास आलं. तेथील विद्युत विभागाशी संपर्क साधून विद्युत प्रवाह बंद करण्याच्या सूचना देत जवानांनी लगेच पाण्याचा मारा सुरू केला. आतमध्ये कोणी प्रवासी अथवा रेल्वे कर्मचारी नसल्याची खात्री केली आणि सुमारे अर्धा तासात आगीवर नियंत्रण मिळवत पुढे कुलिंग ऑपरेशन सुरू ठेवलं. रेल्वे कर्मचारी यांच्या मदतीने इतर दोन डबे सुरक्षित ठिकाणी नेत धोका दूर केला. त्यानंतर आगीवर सतत पाण्याचा मारा सुरू ठेवत आग पुर्ण विझवली. 

डब्याचं मोठं नुकसान

दलाची मदत पोहोचण्यापुर्वी रेल्वे कर्मचारी यांनी उपलब्ध असणाऱ्या छोट्या नळीच्या साह्याने पाणी मारत आग विझवण्याचे प्रयत्न केले. घटनास्थळी रेल्वे पोलिस विभागाची मदत उपस्थित होती. आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नसून जळालेल्या एका डब्याचं पुर्ण नुकसान झालं आहे. 

इतर महत्वाची बातमी-

 
 
 
 

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
Ketan Agrawal Case: 'मी घरासाठी सून आणायला गेलो होतो, पण मुलगाच गमावला'; केतन अग्रवालच्या वडिलांचा अश्रूंचा बांध फुटला!
'मी घरासाठी सून आणायला गेलो होतो, पण मुलगाच गमावला'; केतन अग्रवालच्या वडिलांचा अश्रूंचा बांध फुटला!

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget