एक्स्प्लोर

गिरीश बापटांच्या नावे फेसबुकवर फेक अकाऊंट, आरोपीला बेड्या

पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नावाने फेसबुकवर फेक अकाऊंट ओपन करुन त्यावर महिलांचे अश्लील फोटो पोस्ट केल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी 30 वर्षीय व्यक्तीला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे : पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नावाने फेसबुकवर फेक अकाऊंट ओपन करुन त्यावर महिलांचे अश्लील फोटो पोस्ट केल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी 30 वर्षीय व्यक्तीला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. 22 जून हा प्रकार रोजी उघडकीस आला होता. ऋतुराज नलावडे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. गिरीश बापट यांचे माध्यम सल्लागार सुनील माने यांनी फिर्याद दिली होती. आरोपीने गिरीश बापट यांच्या मूळ खात्यावरुन काही फोटो घेतले आणि फेसबुकवर त्यांच्या नावाने बनावट अकाऊंट तयार केलं. त्यावर महिलांचे अश्लील फोटो टाकण्यात आले होते. दरम्यान याची माहिती मिळताच बापट यांचे माध्यम सल्लागार माने यांनी बंडगार्डन पोलिसांमध्ये याप्रकरणी फिर्याद दिली होती. आरोपीची पत्नी शिक्षिका असून पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवणार होती, त्याचा प्रचार करण्यासाठी आरोपीने मे महिन्यात 17-18 बनावट अकाऊंट्स तयार केली होती. त्यातच एक गिरीश बापट यांच्या नावाचे होते. विशेष म्हणजे आरोपी स्वतःला पत्रकार म्हणवून घेतो, त्याचप्रमाणे कधीतरी 'ग्रामशासन' नावाचं साप्ताहिक काढतो. आरोपीने स्वतः अश्लील फोटो टाकले नसून कुणीतरी त्याला टॅग केले होते आणि त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला अशी माहिती नंतर सांगण्यात आली. या प्रकरणी 22 जूनला तक्रार देण्यात आली होती. आरोपीला गुरुवारी रात्री अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं असून त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Embed widget