एक्स्प्लोर

Pune Drug News : दौंड MD ड्रग्सचे कनेक्शन कुरकुंभ MIDCमध्ये; पुणे शहर पोलिसांचा 10 गाड्यांचा ताफा घेऊन MIDC मध्ये छापा!

पुण्यातील ड्रग्स विक्रीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आलं आहे त्यानंतर आता दौंड एमडी ड्रग्सचे कनेक्शन कुरकुंभ एमआयडीत आढळले आहेत. पुणे शहर पोलिसांचा 10 गाड्यांचा ताफा घेऊन MIDC मध्ये छापा टाकला आहे. 

दौंड, पुणे : शहर ड्रग्सच्या  (Pune drugs)  विळख्यात सापडलं आहे.   पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठी कारवाई करत 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे ड्रग्स जप्त केले आहे. पुणे (Pune)  पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत 52 किलो पेक्षा आधिक मेफेड्रॉन (एमडी- Mephedrone) मिळून आला आहे. त्यातच आता पुण्यातील ड्रग्स विक्रीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आलं आहे त्यानंतर आता दौंड एमडी ड्रग्सचे कनेक्शन कुरकुंभ एमआयडीत आढळले आहेत. पुणे शहर पोलिसांचा 10 गाड्यांचा ताफा घेऊन MIDC मध्ये छापा टाकला आहे. 

दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीतील अर्थकेम लॅबोरेटरी कंपनीवर पुणे शहर पोलीसांनी धाड टाकली असून यामध्ये मोठ्या प्रमाणात मेफेड्रींन(एम डी) ड्रग सापडले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पुणे शहर पोलिसांनी 10 गाड्यांचा ताफा घेऊन MIDC मध्ये छापा टाकलाय. सोमवारी पुण्यात पकडला गेलेला साठा हा कुरकुंभ येथील कंपनीशी निगडीत असल्याचे बोलले जात आहे. कुरकुंभ एमआयडीसी केमिकल झोन असून यापूर्वी देखील अनेकवेळा अशा धाडी टाकण्यात आल्या असून या कंपनीत आणखी किती ड्रग साठा आहे का? याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. 

पुण्यात जप्त करण्यात आलेल्या  आंतरराष्ट्रीय बाजारात एका किलो एमडीची किंमत 2 कोटी रुपये आहे. हे पुण्यात पकडलेले एम डी ड्रग्स मुंबईला पाठवण्यात येणार होते. मुंबईतील पॉल आणि ब्राऊन या ड्रग्स पेडलरकडे  विक्री या ड्रग्सची विक्री होणार होती. पॉल आणि ब्राऊन हे दोघे ही परदेशी नागरिक आहेत. 2 दिवसांपूर्वी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 3 जणांना अटक केली होती. वैभव माने, अजय कारोसिया, हैदर शेख असे या 3 आरोपींची नावे आहेत. यातील माने आणि हैदर यांच्याविरोधात अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा आता पोलीस सखोल तपास करत आहे. त्यासाठी पोलिसांची काही पथकं अनेक ठिकाणी रवाना करण्यात आली आहे. 
 
पिंपरी-चिंचवडमध्ये 16 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे शहरा पाठोपाठ आता पिंपरी- चिंचवडमध्ये लाखो रुपयांच मेफेड्रोन ड्रग्स जप्त करण्यात आलंय, पिंपरी- चिंचवड अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केलीय, मध्यरात्री जुना पुणे- मुंबई महामार्गावर या ड्रग्स ची तस्करी सुरू होती. शहजाद आलाम अब्बास कुरेशीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पैकी 5 लाख 40 हजारांचे मेफेड्रोन ड्रग्स आढळेत. आरोपी विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात मागील काही दिवसांत ड्रग्स तस्करीचं प्रमाणत चांगलंच वाढलं आहे. ड्रग्स तस्करांना अटक करुन शिक्षा जरी केली तर त्यांचं रॅकेट मात्र सुरु आहे. पुणे पोलीस हे रॅकेट उद्ध्वस्त करुन शेवटच्या तस्करांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणातदेखील अनेक धागेदोरे पुढे येण्याची दाट शक्यता आहे. ड्रग्स मुंबई आणि परदेशी पाठवण्यात येणार असल्यानं हे आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेट नेमकं कुठंपर्यंत पसरलं आहे?, याची पोलीस सखोल चौकशी करत आहे. एक एका आरोपीकडून सगळी माहिती घेतली जात आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता धीर सुटतोय..,सोयाबीन खरेदी केंद्रांच्या मुदतवाढीसाठी शेतकरी आक्रमक, रास्ता रोको करत सरकारला इशारा
आता धीर सुटतोय..,सोयाबीन खरेदी केंद्रांच्या मुदतवाढीसाठी शेतकरी आक्रमक, रास्ता रोको करत सरकारला इशारा
Guillain Barre Syndrome : पुणे, सोलापूरनंतर जीबीएसचा खान्देशात शिरकाव, नंदुरबारमधील दोन बालकांना लागण; एकाची प्रकृती चिंताजनक
पुणे, सोलापूरनंतर जीबीएसचा खान्देशात शिरकाव, नंदुरबारमधील दोन बालकांना लागण; एकाची प्रकृती चिंताजनक
'खडसे सत्तापिपासू..', देवेंद्र फडणवीसांना भेटल्यानंतर चंद्रकांत पाटलांची जोरदार टीका, म्हणाले..'सत्तेतून मालमत्ता मिळवत दुकान चालवण्याचा प्रयत्न'
'खडसे सत्तापिपासू..', देवेंद्र फडणवीसांना भेटल्यानंतर चंद्रकांत पाटलांची जोरदार टीका, म्हणाले..'सत्तेतून मालमत्ता मिळवत दुकान चालवण्याचा प्रयत्न'
Video: सुरेश धसांनी चिठ्ठी देताच मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या बीडची घोषणा; सरपंच हत्याप्रकरणारही बोलले
Video: सुरेश धसांनी चिठ्ठी देताच मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या बीडची घोषणा; सरपंच हत्याप्रकरणारही बोलले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Modi Amrutsnan : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं महाकुंभमेळ्यात अमृतस्नानABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 05 February 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्सSanjay Raut Delhi : महाकुंभमधील घटनेवर मला बोलू दिलं नाही,माईक बंद केला..-राऊतSuresh Dhas On Santosh Deshmukh : आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता धीर सुटतोय..,सोयाबीन खरेदी केंद्रांच्या मुदतवाढीसाठी शेतकरी आक्रमक, रास्ता रोको करत सरकारला इशारा
आता धीर सुटतोय..,सोयाबीन खरेदी केंद्रांच्या मुदतवाढीसाठी शेतकरी आक्रमक, रास्ता रोको करत सरकारला इशारा
Guillain Barre Syndrome : पुणे, सोलापूरनंतर जीबीएसचा खान्देशात शिरकाव, नंदुरबारमधील दोन बालकांना लागण; एकाची प्रकृती चिंताजनक
पुणे, सोलापूरनंतर जीबीएसचा खान्देशात शिरकाव, नंदुरबारमधील दोन बालकांना लागण; एकाची प्रकृती चिंताजनक
'खडसे सत्तापिपासू..', देवेंद्र फडणवीसांना भेटल्यानंतर चंद्रकांत पाटलांची जोरदार टीका, म्हणाले..'सत्तेतून मालमत्ता मिळवत दुकान चालवण्याचा प्रयत्न'
'खडसे सत्तापिपासू..', देवेंद्र फडणवीसांना भेटल्यानंतर चंद्रकांत पाटलांची जोरदार टीका, म्हणाले..'सत्तेतून मालमत्ता मिळवत दुकान चालवण्याचा प्रयत्न'
Video: सुरेश धसांनी चिठ्ठी देताच मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या बीडची घोषणा; सरपंच हत्याप्रकरणारही बोलले
Video: सुरेश धसांनी चिठ्ठी देताच मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या बीडची घोषणा; सरपंच हत्याप्रकरणारही बोलले
Pankaja Munde: मोगलांना जसा सह्याद्री कळला नाही, तसा बीड जिल्हा आहे, इकडे गड आहेत पण तिथून राजकारण चालत नाही: पंकजा मुंडे
मी सगळ्यांना देवेंद्र फडणवीसांची लाडकी वाटते, त्यांच्याच हेलिकॉप्टरमधून आले: पंकजा मुंडे
Illegal Indian migrants in US : अमेरिकेतून बेड्या घालून हद्दपार करण्यात आलेल्या भारतीयांची पहिली तुकडी मायदेशात परतली; महाराष्ट्रातील तिघेजण, आता इथंही चौकशी अन् पोलिसांच्या स्वाधीन केलं जाणार!
अमेरिकेतून बेड्या घालून हद्दपार करण्यात आलेल्या भारतीयांची पहिली तुकडी मायदेशात परतली; महाराष्ट्रातील तिघेजण, आता इथंही चौकशी अन् पोलिसांच्या स्वाधीन केलं जाणार!
इराणमध्ये एक फोटो क्लिक अन दोन महिने बंदिस्त, भारतात परतलेल्या योगेशने घडलं ते सगळं सांगितलं!
इराणमध्ये एक फोटो क्लिक अन दोन महिने बंदिस्त, भारतात परतलेल्या योगेशने घडलं ते सगळं सांगितलं!
Shirish More : संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराजांनी देहूत गळ्याला दोरी लावली, आयुष्य संपवलं
संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराजांनी देहूत गळ्याला दोरी लावली, आयुष्य संपवलं
Embed widget