Crime News: साथीदाराचा झाला मृत्यू, टोळीनं प्रेत डोंगरात पुरलं, कुटुंबानं तक्रार दिली अन् चोराचं बिंग फुटलं
Pune Crime News: दुर्गम डोंगरावरील वीजेच्या टॉवरवर चढून तारांची चोरी करण्यासाठी गेलेल्या चोरांपैकी एक जण खाली पडला. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.
Pune Crime News: गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी चोऱ्या झाल्याच्या बातम्या आपल्याला समजतात. मात्र एक अशा चोरीची घटना समोर आली आहे, ज्यामध्ये चोर चोरी करायला गेले खरे पण, सगळंच खूप विचित्र झालं. खानापूर रांजणे-पाबे घाट रस्त्यावरील रांजणे (ता. राजगड) याठिकाणी दुर्गम डोंगरावरील वीजेच्या टॉवरवर चढून तारांची चोरी (Crime News) करण्यासाठी गेलेल्या चोरांपैकी एक जण खाली पडला. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मृतांच्या साथीदारांनी त्याला घाटातील पाबे (ता. राजगड) खिंडीतील दुर्गम डोंगरात खड्डा करून त्यात पुरल्याचा (Crime News) हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे
बसवराज पुरंत मंगनमनी (वय 22, सध्या रा. वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड, मुळ रा. तुळजापूर, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. टॉवरवर चढून लोखंडी ब्लेडने तारांची वायर कापताना बसवराज हा 150 फुट खाली कोसळला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह (Crime News) त्याचे साथीदार रुपेश अरुण येनपुरे व सौरभ बापु रेणुसे (दोघे रा. पाबे, ता. राजगड) यांनी पाबे डोंगरात पुरून ठेवला असल्याची माहिती गुरुवारी (दि. ८) मध्यरात्री वेल्हे पोलीसांना समजली.
त्यानंतर वेल्हे पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी (Crime News) मध्यरात्री दुर्गम पाबे डोंगरात धाव घेतली मात्र अंधार व पावसामुळे पहाटे साडेतीनपर्यंत घटनास्थळाचा शोध लागला नाही. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत बसवराज याच्या दोन साथीदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांना घटनास्थळी आणण्यात येणार आहे.
बसवराज बेपत्ता असल्याची फिर्याद
बसवराज हा बेपत्ता असल्याची फिर्याद त्याच्या नातेवाईकांनी 23 जुलै रोजी सिंहगडरोड पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणी सिंहगड पोलिस तपास करणार असल्याचे वेल्हे पोलिसांनी सांगितले.
नेमकं काय घडलं?
गेल्या महिन्यात 13 जुलै रोजी मयत बसवराज याच्यासह रुपेश येनपुरे व सौरभ रेणुसे हे तिघेजण रांजणे (ता. राजगड) येथे असलेल्या महावितरण कंपनीच्या वीजेच्या टॉवरच्या तांब्याच्या तारांची चोरी (Crime News) करण्यासाठी रात्री गेले. बसवराज हा टॉवरवर चढून लोखंडी ब्लेडने तारांची वायर कापत होता. त्यावेळी तो खाली पडला आणि गंभीर जखमी झाला. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर साथीदार रुपेश व सौरभ याने त्याचा मृतदेह तेथून पाबे (ता. राजगड) घाटात आणला. घाटातील मंदिरासमोरच्या दुर्गम डोंगरात खड्डा खोदून त्यात बसवराज याचा मृतदेह गाडून दोघे पसार झाले.