Pune Crime News : पोलीस आयु्क्तालयासमोरुन पोलिसांचेच वाहनं चोरी, पुणेकरांची वाहनं रामभरोसे?
मागील काही दिवसांपासून पुण्यात वाहन (Pune Crime News) चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. त्यात कधी हौस पूर्ण करण्यासाठी वाहन चोरी करण्यात आली आहे.
पुणे : मागील काही दिवसांपासून पुण्यात वाहन (Pune Crime News) चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. त्यात कधी हौस पूर्ण करण्यासाठी वाहन चोरी करण्यात आली आहे. तर कधी थेट वाहन चोरणाऱ्यांची टोळी वाहन चोरी करुन ते दुसऱ्या शहरात विकत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र चोरी झालेल्या वाहनांचा शोध पुणे पोलिसांकडून मोठे प्रयत्न करुन घेतला जायचा. मात्र आता पुणे पोलीस आयुक्तालयाच्या समोरून च पोलिसांच्या दुचाकी चोरी केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
पुणे पोलीस आयुक्तालयासमोरुन पोलिसांच्याच दुचाकी चोरी गेल्याने आता पुणेकरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पेलणाऱ्या पुणे पोलिसांनाच आव्हान निर्माण झालं आहे. पुणे पोलीस आयुक्तालयासमोर तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या दुचाकी पार्क केल्या होत्या. या तिघांच्याही दुचाकी चोरीला गेल्या. त्यामुळे वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या तीन पैकी एक वाहन पुण्यातील एका भागात सापडलं याप्रकरणी मात्र पोलिसात गुन्हा दाखल नाही आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या पार्किंगमधून चोरीला गेलेल्या वाहनांमुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अवघ्या अडीच महिन्याच्या काळात चोरट्यांनी तब्बल 400 वाहने चोरी केली आहेत. त्यांची किंमत जवळपास 1 कोटी 51 लाख 84हजार रुपयांच्या घरात आहे.
ही वाहन चोरी थांबावी म्हणून पुणे पोलिसांकडून विशेष लक्ष दिलं जात आहे. मात्र तरीही वाहन चोरीच्या घटना थांबत नाही आहे. पुण्यात या वर्षीच्या सुरुवातीपासूनच वाहन चोरीच्या घटना चांगल्याच वाढल्या आहेत. दर दिवसाला किमान सात ते आठ वाहनं चोरी जात असल्याचं समोर आलं आहे. ही वाहन चोरी थांबावी यासाठी स्वतंत्र दोन 'वाहन चोरी विरोधी पथक' कामाला लागली आह वाहन चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतंत्र दोन 'वाहन चोरी विरोधी पथक' आहेत. त्यांची उत्तर, दक्षिण अशी विभागणी केली आहे. तसेच, त्यांच्या कामांचे वाटप केले आहे. पण, या पथकांना वाहन चोरींच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात म्हणावे तसे यश येत नसल्याचे दरवर्षीच्या आलेखावरून दिसून येत आहे. मात्र पोलिसांचीच वाहनं चोरी जात असेल तर पुणेकरांची वाहनं रामभरोसे आहेत का?, असा प्रश्न उपस्थित होतो.
इतर महत्वाची बातमी-
बंगळुरूत 'यलो अलर्ट'; संपूर्ण आठवडाभर वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईतील परिस्थिती काय?