एक्स्प्लोर

Pune Crime News : पुण्याचे फर्जी? घरातच छापल्या नोटा; बनावट नोटा छापणाऱ्या दोघांना अटक, पुण्यातील हिंजवडीतील घटना

आयटी पार्क हिंजवडी परिसरात बनावट चलनी नोटा घेऊन माण गावात जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.

पुणे : फर्जी या बेवसिरीजप्रमाणे तीन तरुणांनी घरातच बनावट चलनी नोटा (Fake Currency) छापल्याचा संशय (Pune Crime news) पोलीसांनी व्यक्त केला आहे. आयटी पार्क हिंजवडी परिसरात (Hinjawadi Police Station) या बनावट चलनी नोटा घेऊन माण गावात जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले असून, या तिघांकडून 1 लाख 20 हजार रुपये किमतीच्या 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. 

घरातच या नोटा छापल्या पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, या नोटांची उत्कृष्ठ क्वॉलिटी पाहता यामध्ये परराज्य अथवा परदेशातील काही लोकांचा सहभाग आहे का हे पडताळून पाहिले जात आहे. शुक्रवारी (16 फेब्रुवारी) दुपारी बोडकेवाडी फाटा, माण हिंजवडी रोड येथे पोलीसांनी ही कारवाई केली. अभिषेक राजेंद्र काकडे (वय 20), ओंकार रामकृष्ण टेकम (वय 18, दोघे रा. हिंजवडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार श्रीकांत चव्हाण यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.

यापूर्वी डिसेंबर 2022 मध्ये कुर्डुवाडीतील टेंभुर्णी चौकात ग्रामीण गुन्हे शाखेने चौघांना अटक केली होती. या लोकांनी उरळी देवाची येथून प्रिंटर मशिन व सामान आणून 500 रुपयांच्या 10 नोटा तयार केल्या होत्या. ऑक्टोबर 2022 मध्ये महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) बांगलादेशातून बनावट नोटांची तस्करी आणि तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना अटक केली होती. फेब्रुवारी 2024 मध्ये हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडून 1 लाख 10 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. 12 ऑक्टोबर 2022 रोजी पुणे टेरिटोरियल युनिटच्या अधिकाऱ्यांनी तस्करीच्या भारतीय बनावट नोटा जप्त केल्या होत्या. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

कशा ओळखायच्या बनावट नोटा?

-वॉटरमार्क म्हणजे नोटेवरील चित्राची प्रतिकृती असून ती नोटेच्या दोन्ही बाजूला दिसते. वॉटरमार्क गहाळ असल्यास किंवा पोर्ट्रेटशी जुळत नसल्यास नोट बनावट असण्याची शक्यता असते.

-सर्व भारतीय नोटांमध्ये एक सुरक्षा धागा असतो जो नोटेच्या माध्यमातून उभा चालतो. प्रकाशासमोर ठेवल्यावर धागा स्पष्ट दिसतो आणि त्यावर नोटेचा भाव छापला जातो.

-सी-थ्रू रजिस्टर ही नोटेच्या डाव्या बाजूला असलेली एक छोटी खिडकी आहे. रजिस्टरमध्ये एक मूल्य क्रमांक छापलेला असतो, जो नोटेच्या दोन्ही बाजूंनी पाहता येतो. रजिस्टर गहाळ असेल किंवा योग्य आकडा नसेल तर नोट बनावट असण्याची शक्यता असते.

इतर महत्वाची बातमी-

Pune Crime News : पोलिसांची पैशाची लालसा, रचलेला बनाव पोलिसांनीच उघडा पाडला; हवालाचे 45 लाख रुपये लुटणारे 3 पोलीस कर्मचारी बडतर्फ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पोरेल-स्टब्सची वादळी अर्धशतकं, दिल्लीचं लखनौसमोर 209 धावांचं आव्हान
पोरेल-स्टब्सची वादळी अर्धशतकं, दिल्लीचं लखनौसमोर 209 धावांचं आव्हान
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Bhavesh Bhinde : अपक्ष उमेदवार ते आरोपी, घाटकोपर  दुर्घटनेतील भावेश भिंडे नेमका कोण?Eknath Shinde Majha Vision Full : खोके ते कंटेनर, कसाब ते मुसा! शिदेंनी ठाकरेंना सर्व बाजूने घेरलंGhatkopar Hoarding Accident : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला 24 तास, बचावकार्य अजूनही सुरुच!Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 14 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोरेल-स्टब्सची वादळी अर्धशतकं, दिल्लीचं लखनौसमोर 209 धावांचं आव्हान
पोरेल-स्टब्सची वादळी अर्धशतकं, दिल्लीचं लखनौसमोर 209 धावांचं आव्हान
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
Jayant Patil : बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
Jayant Patil : पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
Embed widget