एक्स्प्लोर

Pune Crime News: शरद मोहोळ खून प्रकरणात मोठा ट्विस्ट; मास्टरमाइंड असल्याचा दावा केलेल्या आरोपीला सोडण्याचे कोर्टाचे आदेश, पुणे पोलिसांना दणका, नेमकं प्रकरण काय?

Pune Crime News: विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे हे मोहोळच्या खुनाचे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा पोलिसांनी केला होता.

पुणे: पुण्यातील गुन्हेगारी विश्वात काही वर्षांपूर्वी एका मोठ्या खूनाची घटना घडली होती. पुण्यातील गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol Murder Case) याचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता, त्या खटल्यात मोठा ट्विस्ट आला आहे. यामुळे पोलीस तपासाला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानला जाणारा विठ्ठल शेलार याला तातडीने मुक्त करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. पोलिसांकडून अटकेची प्रक्रिया राबवताना झालेल्या कायदेशीर त्रुटींमुळे न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.(Sharad Mohol Murder Case) 

Pune Crime News: नेमकं प्रकरण काय?

गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार विठ्ठल शेलार याने पोलिसांनी केलेल्या बेकायदेशीर अटकेविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात 'हेबियस कॉर्पस रिट' याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या सुनावणीनंतर न्यायालयाने ही अटक बेकायदेशीर ठरवत विठ्ठल शेलार याला मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत, शरद मोहोळचा ५ जानेवारीला 2024 ला कोथरूडमधील सुतारदरा परिसरात भरदिवसा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या प्रकरणात विठ्ठल शेलार आणि गणेश मारणेसह एकूण १८ जणांविरोधात महाराष्ट्र गुन्हेगारी कायद्यानुसार (मकोका) संघटित नियंत्रण कारवाई करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात पुण्यातील विशेष न्यायालयात १७५० पानांच्या दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे हे दोघे मोहोळच्या खुनामागचे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. 

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी अटक केल्यानंतर २४ तासांच्या आत न्यायालयासमोर हजर केले नसल्याचा दावा विठ्ठल शेलारने करत उच्च न्यायालयात 'हेबियस कॉर्पस रिट' याचिका दाखल केली होती. मोहोळच्या खुनानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शेलारला पनवेल येथून अटक केली होती. मात्र, त्याला तिसऱ्या दिवशी न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. आरोपीला अटक करताना त्याचा आधार व त्यामागची कारणेही दिली नव्हती. ही अटक बेकायदा असल्याचा युक्तिवाद विठ्ठल शेलारच्यावतीने वकिलांनी केला. तो ग्राह्य धरून न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने शेलारला सोडण्याचा आदेश दिले आहेत.

Pune Crime News: 'हेबियस कॉर्पस रिट' म्हणजे नेमकं काय ?

एखाद्याला अटक केल्यास त्यास न्यायालयात हजर करून अटकेचे कारण व कायदेशीरता तपासली जाते. जर अटक बेकायदेशीर आढळली, तर न्यायालय त्या व्यक्तीची तत्काळ सुटका करण्याचा आदेश देते. ही याचिका नागरिकांना मनमानी आणि बेकायदेशीर अटकेपासून वाचवते आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण करते. ही याचिका पोलिस, सरकारी अधिकारी किंवा खासगी व्यक्ती त्यांच्याविरुद्ध दाखल केली जाऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या

Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम

व्हिडीओ

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget