Pune Crime News: बापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार, आई घराबाहेर गेल्यावर बाप मुलीवर करायचा जबरदस्ती, घटनेने संताप
Pune Crime News: आई घराबाहेर गेल्यावर नराधम बाप मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करत होता, अशी धक्कादायक माहिती समोर आला आहे.

पुणे: स्वारगेटमधील अत्याचाराची घटना ताजी असतानाच आणखी एका घटनेने पुणे हादरलं आहे. पुण्यात पुन्हा लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. बापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यातील नांदेड सिटी परिसरात घडली आहे. स्वतःच्या 14 वर्षे मुलीवर नराधम बाप 8 महिने लैंगिक अत्याचार करत होता. आई घराबाहेर गेल्यावर नराधम बाप मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करत होता, अशी धक्कादायक माहिती समोर आला आहे.
याप्रकरणी पुण्यातील नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर 45 वर्षीय नराधम बापाला अटक करण्यात आली आहे. बाल हक्क समितीने हा प्रकार उघडकीस आणला आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करत नराधम बापाला काल बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आई घराबाहेर गेल्यावर नराधम बाप मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करत होता, अशी धक्कादायक माहिती समोर आला आहे.
स्वारगेट बसस्थानकात अत्याचाराची घटना
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील स्वारगेट एसटी बस डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना मंगळवारी घडली होती. या प्रकरणातील आरोपी नराधम हा सराईत गुन्हेगार असून तो एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याची चर्चा आहे. आरोपी दत्ता गाडेवर विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण 7 गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर हा गुन्हा केल्यानंतर नराधम आरोपीने दोन ते तीन वेळा आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवशाही बस ही रात्रभर स्वारगेट बस स्थानकात होती.
पीडितेने याबाबत सकाळी 9.30 च्या सुमारास पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली, त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या घटनेतील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी 1 लाखाचे बक्षीस जाहीर केले होते. आरोपी दत्तात्रय गाडे याच्यावर सरकारी बसमध्ये पहाटे 5.30 च्या सुमारास एका युवतीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही घटना स्वारगेट येथील बस स्थानकात घडली. शिवशाही बस ही रात्रभर स्वारगेट बस स्थानकात होती. पीडितेने याबाबत सकाळी 9.30 च्या सुमारास पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या घटनेतील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी 1 लाखाचे बक्षीस जाहीर केले होते.



















