Pune Crime News: मध्यरात्री झोपेत घराबाहेर मोठा आवाज; खिडकीतून पाहिलं तर...आरोपी पळाले, चौघांपैकी एकाला नागरिकांनी पकडलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार
Pune Crime News: पूर्वीच्या भांडणाच्या पार्श्वभूमीवर पाषाणमधील सोमेश्वरवाडीतील संध्यानगरमध्ये पार्क केलेल्या वाहनांची दगड आणि धारदार शस्त्रांच्या साहाय्याने तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुणे: शिक्षणाचं माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी (Pune Crime News) वाढल्याचं चित्र आहे. पुण्यात वाहन तोडफोडीची मालिका सुरूच आहेत. पुण्यातील पाषाणमधील सोमेश्वरवाडीत चौघांनी वाहनांची तोडफोड (Pune Crime News) केली आहे. पूर्वीच्या भांडणाच्या पार्श्वभूमीवर पाषाणमधील सोमेश्वरवाडीतील संध्यानगरमध्ये पार्क केलेल्या वाहनांची दगड आणि धारदार शस्त्रांच्या साहाय्याने तोडफोड केल्याचा (Pune Crime News) प्रकार समोर आला आहे. सोमवारी (दि. 21 एप्रिल) मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास घडला आहे. तोडफोड करुन पळून जाणाऱ्या (Pune Crime News) चौघांपैकी एकाला नागरिकांनी पाठलाग करून पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.(Pune Crime News)
चतुशृंगी पोलिसांनी तीन अल्पवयीनांसह (Pune Crime News)चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 21 एप्रिलच्या मध्यरात्री फिर्यादी हे घरात झोपले असताना त्यांना घराबाहेर मोठा (Pune Crime News) आवाज ऐकू आला. त्यांनी खिडकीतून पाहिले असता, त्यांची दुचाकी तसेच इतर नागरिकांच्या दुचाकींची चौघे दगड व हत्यारांनी (Pune Crime News) तोडफोड करत असल्याचे दिसून आले. दरम्यान, परिसरातील नागरिक बाहेर आले असता आरोपी पळून जाऊ लागले. या वेळी नागरिकांनी त्यातील एकाला पकडून पोलिसांच्या हवाली केला.अधिक तपास पोलीस करत आहेत. (Pune Crime News)
पुण्यातील दत्तवाडी लक्ष्मी नगर पर्वती परिसरातही तोडफोड
काही दिवसांपूर्वी पुण्यातील दत्तवाडी लक्ष्मी नगर पर्वती परिसरातही तोडफोड झाल्याची घटना समोर आली होती. गेल्या काही दिवसांपासून गाडी तोडफोडीचे (Pune Crime News) सत्र सुरूच आहे. लक्ष्मी नगर पर्वती परिसरात सलग दुसऱ्या गाड्यांची तोडफोड झाली होती. पुण्यातील दत्तवाडी लक्ष्मी नगर पर्वती परिसरात चार चाकी आणि रिक्षाची तोडफोड केली होती. शहरात तोडफोडी सत्र (Pune Crime News)सुरूच आहे. पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतील सात ते आठ वाहनांची (Pune Crime News) तोडफोड करण्यात आली होती.























