Pune Crime News: पुण्यात नेमका धाक कोणाचा? पोलिसांच्या गाडीची तोडफोड अन् हवालदाराला मारहाण करणाऱ्या व्यक्तीला अटक
पिंपरी चिंचवडमधील भोसरी परिसरात पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करुन आणि ड्युटीवर असलेल्या पोलीस हवालदाराला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
Pune Crime News: पिंपरी चिंचवडमधील (Pune Crime) भोसरी परिसरात पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करुन आणि ड्युटीवर असलेल्या पोलीस हवालदाराला (Pune police) मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. 34 वर्षीय रामा कुंडलिक शिंदे असे या व्यक्तीचे नाव आहे. तो मूळचा उस्मानाबादचा असून तो अर्थमूव्हर मशिनरी ऑपरेटर म्हणून काम करतो. या प्रकरणी 48 वर्षीय हवालदार रामदास वाव्हळ यांनी तक्रार केली होती. भोसरी वाहतूक विभागात कार्यरत आहेत आणि सोमवारी पहाटे नाशिक फाटा येथे रात्रीच्या ड्युटीसाठी तैनात होते.
आरोपी शिंदे यांनी सुरुवातीला पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करुन काचा फोडल्या. त्यावेळी एक ड्युटीवर कॉन्स्टेबल गाडीत होते. हवालदार खाली उतरले आणि त्याला पकडले, त्यानंतर दोघांमध्ये वादावादी झाली. ही वादावादी टोकाला गेली. संताप अनावर झाल्याने त्याने हवालदाराला मारहाण केली आणि शिवीगाळ केली, असे या प्रकरणाचे तपास अधिकारी उपनिरीक्षक रवींद्र भवरी यांनी सांगितले.
दरम्यान पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याने शहरात नेमका धाक कोणाचा असा प्रश्न विचारला जा आहे. जिथे पोलीस सुरक्षित नाही तर तिथे सर्वसामान्यांचं काय, असाही सवाल नागरिक विचारत आहेत.
पोलिसांच्या वाहनाची तोडफोड का केली?
शिंदे हे काही दिवसांपूर्वीच उस्मानाबादहून पुण्यात आला होता. तो पुण्यात मशिनरी ऑपरेटर म्हणून काम करायचा. त्याने अचानक पोलिसांच्या गाडीची तोडफोड केली आणि हे पाहून हवालदार गाडी बाहेर पडले. मात्र त्यांना देखील मारहाण केली. काही दिवसांपूर्वीच पुण्यात आलेल्या शिंदे याने पोलिसांच्या वाहनाची तोडफोड का केली? याचा पोलीस तपास करत आहेत. शिंदे यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या (IPC) अनेक कलमांखाली सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले, शारीरिक हल्ला, गुन्हेगारी धमकी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धानोरीत देखील पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण
पुण्यातील धानोरीत भर रस्त्यात पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. चार-पाच जणांमध्ये गाडी काढण्यावरुन पोलिसांशी वाद झाला. वाद शिगेला पोहचल्यानंतर हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत पोलीस कर्मचारी यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. प्रदीप मोटे असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. एका व्यक्तीशी गाडी लावण्यावरुन वाद झाला. त्या व्यक्तीने गाडी बाजूला घे म्हणून पोलीस कर्मचारी मोटे यांना सांगितलं. याच वेळी दोघांमध्ये वाद झाला आणि त्या व्यक्तीने मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत ते जखमी झाले.