Pune Crime News : कोयता गँगची दहशत संपेना! बिबवेवाडीत 10 ते 15 गुंडानी कोयत्याने गाड्या फोडल्या, कोयता गॅंगला रोखण्यात पुणे पोलीस अपयशी?
बिबवेवाडीत परिसरात पुन्हा एकदा कोयता हल्ल्याची घटना समोर आली आहे. बिबवेवाडीत सुपर परिसरात काल रात्री 11च्या सुमारास कोयता हल्ला करण्यात आला आहे.
पुणे : पुण्यात कोत्या हल्ल्याचे प्रकार वाढतच (Pune Crime news) असल्याचं दिसून येत आहे. रोज एका परिसरात कोयत्याने वार केल्याची घटना समोर येत आहे. त्यातच बिबवेवाडीत परिसरात पुन्हा एकदा कोयता हल्ल्याची घटना समोर आली आहे. बिबवेवाडीत सुपर परिसरात काल रात्री 11च्या सुमारास कोयता हल्ला करण्यात आला आहे. 10 ते 15 गुंडानी 5 रिक्षा, 15 ते 20 दुचाकी आणि एका कारवर कोयत्याने वार करत वाहनांचे नुकसान करून, दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे.
या घडलेल्या घटनांमुळे या भागातील महिला लहान लहान मुले आणि नागरिक प्रचंड दहशतीत आहेत. वारंवार असे प्रकार घडत असून, पोलीस या गुंडांवर कारवाई करत नसल्याचा आरोप देखील स्थानिक नागरिकांनी केला आहे. पुणे शहरात दिवसेंदिवस कोयत्याची दहशत वाढत आहे.
पुणे पोलिसांना कोयत्याची दहशत मोडीत काढण्यास अपयश येत आहे. अप्पर परिसरात वारंवार अशा घटना घडत असल्याने नागरिक दहशतीखाली आहेत. जे नागरिक या सर्व प्रकाराचा पाठपुरावाकडून पुरावे जमा करण्याचा प्रयत्न करतात त्यांची व्हिडिओ पोलिसांकडून डिलीट केले जातात. पोलिसांकडूनही या गुंडांना पाठबळ दिले जात. घटनाहून 12 तास उलटले तरीही पंचनामे पोलिसांनी केले नाहीत. अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे. मागील काही दिवसांपूर्वी पुण्यातील अनेक गुंडाची परेड काढण्यात आली त्यानंतर अनेक सराईत गुंडांना बोलवून तंबी देण्यात आली तरीही असे प्रकार संपायचं नाव घेत नाही आहे. त्यामुळे नागरिकदेखील संताप व्यक्त करताना दिसत आहे.
पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान
पुण्यात मागील काही दिवसांपासून कोयता हल्ल्यांच्या घटनेत वाढ झाली आहे. पुण्यातील विविध परिसरात कोयता गॅंगने दहशत माजवली आहे. ही दहशत रोखण्याचे प्रयत्न पुणे पोलिसांकडून सातत्याने सुरु आहेत. मात्र तरीही प्रकार संपत नसल्याचं समोर येत आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अनेक उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे. या टवाळ गुन्हेगारांना रोखण्यासाठी रोज नव्या शक्कल लढवत आहेत. अल्पवयीन गुन्हेगार असेल तर त्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारादेखील दिला आहे. या टवाळखोरांना रोखण्याचं पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.
इतर महत्वाची बातमी-
Manoj Jarange: पाडण्यातही आपला विजय, मराठा विरोधकांना या निवडणुकीत पाडा : मनोज जरांगे