Pune crime news : पुण्यात कोरियन व्लॉगरसोबत छेडछाड, व्हिडीओ व्हायरल, पोलिसांनी काही तासातच मुसख्या आवळल्या!
पुण्यातीलल रावेतमध्ये कोरियन व्हिडीओ ब्लॉगर 'केली' नावाच्या तरुणीसोबत गैरकृत्य केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. जगभरातून या व्हिडीओवर संताप व्यक्त करण्यात आला
रावेत, पिंपरी-चिंचवड : पुण्यातीलल रावेतमध्ये कोरियन व्हिडीओ (Pune Crime News) ब्लॉगर 'केली' नावाच्या तरुणीसोबत गैरकृत्य केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि जगभरातून या व्हिडीओवर संताप व्यक्त करण्यात आला. भारतातील संस्कृती, खाद्यसंस्कृती आणि वेशभूषेतील प्रकार केली आपल्या ब्लॉग मधून दाखवताना एका स्टॉल मालकाने थेट तिच्यासोबत गैरकृत्य केलं. याच स्टॉल मालकाला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भरत हुनुसळे असं या मालकाचं नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
व्हिडीओत नेमकं काय आहे?
कोरियन व्हिडीओ ब्लॉगर 'केली' हिने तिच्या युट्यूबवर 2 मिनीटांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. साधारण दिवाळीमधला हा व्हिडीओ आहे. यात ती पुण्यातील रावेत परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना आणि पुण्याची, सोबतच भारताची संस्कृती समजून घेताना दिसत आहे. या दररम्यान ती अनेक नागरिकांशीदेखील चर्चा करताना दिसत आहे. मात्र याच व्हिडीओच्या शेवटी मात्र ती एका फटाक्याच्या दुकानात जाते आणि सगळ्यांना तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी विचारते. त्यावेळी भरत हुनुसळे नामक तरुण तिच्या थेट खांद्यावर हात टाकून तिची छेड काढताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
पोलिसांनी व्हिडीओ पाहिला अन् थेट जाऊन तरुणाला शोधलं!
हा व्हिडीओ सगळ्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि त्यानंतर या व्हिडीओची सर्वत्र चर्चा झाली. देशभरातूनच नाही तर विदेशातूनदेखील या व्हिडीओवर संताप व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया उमटल्या. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या दृष्यातून जागेचा शोध घेतला. त्यानंतर फटाक्याचं स्टॉल बंद दिसलं. आजूबाजूच्या दुकानात चौकशी केली आणि त्यानंतर थेट पोलिसांनी या छेड काढणाऱ्या तरुणाला शोधून काढलं. त्याला रावेत पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
भारताची संस्कृती जगापुढे मांडत होती पण...
केली ही कोरियन व्हिडीओ ब्लॉगर आहे. ती वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथली संस्कृती, खाद्यसंस्कृती, परंपरा जगापुढे मांडण्याचा प्रयत्न करते. आतापर्यंत तिने भारतातील वेगवेगळ्या राज्यात जाऊन त्या त्या राज्याची संस्कृती दाखवताना दिसत आहे. कधी कर्नाटक तर कधी वेगवेगळ्या राज्यात फिरून व्लॉग्स करत असते. त्यात ती भारताच्या लोकांचं कौतुकही करताना दिसते मात्र पुण्यातच तिच्यासोबतच हा प्रकार घडला. तिच्यासोबत घडलेला हा प्रकार शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाण्याऱ्या पुण्यात घडल्याने नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या एका व्हिडिओमुळे भारताची मान शरमेनं खाली गेली, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
On camera, Korean vlogger harassed in Pune: 'They really like to hug'
— Pune City Life (@PuneCityLife) December 19, 2023
Don't let such people go scot-free. @PuneCityPolice @DGPMaharashtra @MahaPolicepic.twitter.com/WlD4tg1QAK
इतर महत्वाची बातमी-