एक्स्प्लोर

Pune Crime : पुण्यात मसाज सेंटरवर छापा, परदेशी महिलांना नोकरीवर ठेवून सुरु होता वेश्याव्यवसाय

Pune Crime : : पुण्यातील परदेशी नागरिक नोंदणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खासगी मसाज सेंटरवर छापा टाकला. कोंढवा परिसरातील या खासगी स्पामध्ये परदेशी महिला वैध व्हिसाशिवाय काम करताना आढळल्या.

Pune Crime : पुण्यातील (Pune) परदेशी नागरिक नोंदणी विभागाच्या (Foreigners Registration Office) अधिकाऱ्यांनी खासगी मसाज सेंटरवर (Massage Centre) छापा टाकला. कोंढवा (Kondhwa) परिसरातील या खासगी स्पामध्ये परदेशी महिला वैध व्हिसाशिवाय (Visa) काम करताना आढळल्या. या महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेतला जात असल्याचं सांगितलं जात आहे. तत्पूर्वी व्हिसा कागदपत्रांची पूर्तता न केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

वैध व्हिसाशिवाय काम, चार परदेशी महिलांवर गुन्हा

फॉरेनर्स रजिस्ट्रेशन ऑफिसच्या (FRO)अधिकार्‍यांनी शुक्रवारी 24 मार्च रोजी शहरातील कोंढवा भागातील एका खाजगी स्पावर छापा टाकला होता. या छाप्यादरम्यान अवैधरित्या परदेशी महिलांना नोकरीवर ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात विदेशी व्यक्ती अधिनियम कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे. परदेशी नागरिक नोंदणी विभागाच्या नियमावलीनुसार परदेशी व्यक्तीने नोकरी करण्यासाठी व्हिसा संदर्भातील आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचं आहे. परंतु, कागदपत्रांची पूर्तता न केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यावर मायदेशी पाठवणार

या महिला बिझनेस व्हिसावर भारतात आल्या होत्या. पण त्या योग्य रोजगार व्हिसाशिवाय स्पामध्ये काम करत होत्या. या महिला थायलंड देशातील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना सध्या मुंढवा इथल्या शासकीय महिला सुधारगृह इथे ठेवण्यात आलं आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या चार महिलांना लवकरच त्यांच्या मायदेशी पाठविण्यात येणार असल्याचे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी सांगितलं.

मसाज सेंटरच्या मालक, मॅनेजरविरोधात गुन्हा

दरम्यान या कारवाईत मसाज सेंटरचा मालक, व्यवस्थापकासह जागा मालकाविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या महिलांकडे रोजगार व्हिसा नसतानाही त्यांना कामावर ठेवल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. कोंढवा पोलीस पुढील तपास करत आहेत.

कोरेगाव पार्कमध्ये मसाज सेंटरमधील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

दरम्यान आठवड्याभरापूर्वी पुण्यातील कोरेगाव पार्क इथल्या स्पा सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला होता. मसाज सेंटरच्या नावाखाली मुलींना वेश्याव्यवसायात अडकवणाऱ्या मसाज सेंटरच्या संचालकाला पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरुन सात मुलींना ताब्यात घेतले. ज्यामध्ये अनेक मुली इतर राज्यातील सांगितल्या जात आहेत.

पुण्यात गुन्हेगारीत वाढ

पुण्यात सातत्याने गुन्हेगारीत वाढ होताना दिसत आहे. रोज पुण्यात नवे गुन्हे समोर येत आहेत. महिलांवरील अत्याचार, लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहे. शिवाय कोयता गँग, चुहा गँगचीही दहशत पाहायला मिळते. 

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Thane Mayor Office : ठाण्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच महापालिकेतील महापौर दालन उघडलं
Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE
Sanjay Raut PC : कल्याण-डोंबिवलीत आमचे 2 नगरसेवक संपर्कात नाहीत, संजय राऊतांची कबुली
Akshay Kumar Car Accident : जूहूत 3 गाड्यांचा अपघात, अपघातग्रस्त रिक्षाची अक्षय कुमारच्या कारला धडक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
Pune Shivsena UBT: सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
Prashant Jagtap: मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
Sahar Shaikh MIM TMC Election 2026: आपल्याला संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचाय, पाच वर्षांनी इथला प्रत्येक विजयी उमेदवार MIM चा असेल; जितेंद्र आव्हाडांना ललकारणारी सहर शेख कोण?
आपल्याला संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचाय, पाच वर्षांनी इथला प्रत्येक विजयी उमेदवार MIM चा असेल; जितेंद्र आव्हाडांना ललकारणारी सहर शेख कोण?
Embed widget