(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime News : पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्स प्रकरणात ईडीची उडी; आरोपींच्या मालमत्तेची माहिती मागवली!
पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्स प्रकरणात रोज नवे खुलासे होताना दिसत आहे. त्यातच आता ड्रग्स प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे अंतराष्ट्रीय ड्रग्स प्रकरणात ईडीने उडी घेतली आहे.
पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्स प्रकरणात रोज नवे खुलासे होताना दिसत आहे. त्यातच आता ड्रग्स प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे अंतराष्ट्रीय ड्रग्स प्रकरणात ईडीने उडी घेतली आहे. ड्रग्स प्रकरणातील आरोपींची ईडीने माहिती मागवली आहे. पुणे पोलिसांकडून ईडीने सर्व आरोपींच्या मालमत्तेची माहिती मागवली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात अजून मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
पुणे ड्रग्स प्रकरणातील सगळे कागदपत्र पोलिसांकडून मागवण्यात आले आहे. या संदर्भात ईडीने पुणे पोलिसांना पत्र पाठवलं आहे. हे पत्र प्राप्त झाल्यानंतर पुणे पोलिसांनी आरोपींच्या मालमत्तेचा तपास करायला सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत पुणे पोलिसांनी ड्रग्स प्रकरणात 11 आरोपींना विविध ठिकाणाहून अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 3500 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत.
ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी वैभव उर्फ पिंट्या माने (वय 40), अजय करोसिया (35), हैदर नूर शेख (40), भीमाजी परशुराम साबळे (वय 46), केमिकल इंजिनिअर युवराज बब्रुवान भुजबळ (वय 41), आयुब अकबरशहा मकानदार (वय 48), दिल्लीतून संदिप राजपाल कुमार (वय 39), दिवेष चरणजित भुथानी (वय 38), संदिप हनुमानसिंग यादव (32) व देवेंद्र रामफुल यादव (वय 32) व पश्चिम बंगालमधन सुनिल विरेंद्रनाथ बर्मन (वय 42) अशा आकरा जणांना अटक केली आहे.
18 फेब्रुवारील पुण्यातील सोमवार पेठेत ड्रग्स विक्रि होणार असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. यानंतर पुणे पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली होती. त्यानंतर आरोपींकडून माहिती घेत विश्रांतवाडीत छापा टाकून मिठाच्या पुड्यातून विक्री करण्यात येत असलेला ड्रग्स साठा जप्त केला. यानंतर या आरोपींकडून एक एक पत्ते खुलत गेले आणि पुणे पोलीस थेट या ड्रग्सच्या कारखान्यापर्यंत पोहचले. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कुरकुंभ गावात असलेल्या एका औषधीच्या कारखान्यात ड्रग्स तयार केलं जात होतं आणि हे ड्रग्स विविध भागात विकलं जात होतं.
दौंडमध्ये छापा टाकल्यानंतर या ड्रग्स रॅकेटचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आलं. हे ड्रग्स कुरकुंभपासून फक्त राज्यात नाही तर देशातील इतर राज्यात विकलं जात असल्याचं समोर आलं. हे ड्रग्स दिल्लीतदेखील पुरवलं असल्याचं समोर आलं आणि त्यानंतर थेट विमानामार्गे लंडनला गेल्याचंदेखील पोलीस तपासात समोर आलं. या ड्रग्स रॅकेटची व्याप्ती पाहून आणि डग्ससाठी हवालाने पैसे व्यवहार झाल्याचं पाहून या प्रकरणात आता ईडीने उडी घेतली आहे.
इतर महत्वाची बातमी-