Pune Crime News : पिझ्झा डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण करत हवेत गोळीबार; पुण्यातील घटना
पिझ्झा डिलिव्हरी देण्यासाठी उशीर झाल्याने चिडलेल्या ग्राहकाने पिझ्झा डिलिव्हरी बॉयला मारहाण करत हवेत गोळीबार केल्याची घटना काल रात्री पुण्याजवळील वाघोलीमध्ये घडली आहे.
पुणे : पिझ्झा डिलिव्हरी देण्यासाठी उशीर झाल्याने चिडलेल्या ग्राहकाने (Pune Crime News) पिझ्झा डिलिव्हरी (Firing) बॉयला मारहाण करत हवेत गोळीबार केल्याची घटना काल रात्री पुण्याजवळील वाघोलीमध्ये घडली. पुण्याजवळील वाघोली परिसरात असलेल्या वाघेश्वर मंदिराजवळ ही धक्कादायक घटना घडली आहे. चेतन वसंत पडवळ असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
रोहित राजकुमार हुलसुरे हे वाघोली परिसरात असलेल्या एका पिझ्झा सेंटरमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉयचे काम करतात. काल रात्री उशिरा आरोपी चेतन पडवळ याने ऑनलाईन पिझ्झा डिलिव्हरीची ऑर्डर दिली होती. मात्र ही ऑर्डर डिलिव्हरी बॉय रोहित हुलसुरे याने उशिरा पोहोचवल्याने आरोपीने रोहितला आधी मारहाण केली. या महाराणीचा जाब पडवळ यांना विचारण्यासाठी पिझ्झा डिलिव्हरी केंद्रातील देवेंद्र राहुल आणि इतर त्याचे मित्र गेले असता आरोपीने या सर्वांना मारहाण करत त्याच्या कारमधून एक पिस्तुल काढून हवेत गोळीबार केला. या प्रकरणी आरोपी चेतन पडवळ याच्यावर लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. अशा घटनांमुळे सामान्य जनतेत देखील घबराट पसरली आहे.
पुण्यात गुन्हेगारीच्या संख्येत वाढ
काही दिवसांपूर्वी अशीच घटना पुढे आली होती. मित्रांवर केवळ इम्प्रेशन पाडण्यासाठी परवानाधारक पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना समोर आली होती. पुण्यातील खडकवासला धरणाच्या परिसरात ही घटना घडली होती. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला होता. तिघेही पुण्यातच राहत होते. तेजस प्रकाश गोंधळे, अजिंक्य भानुदास मोडक आणि चेतन मच्छिंद्र मोरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे होती. तेजस गोंधळे, अजिंक्य मोडक आणि चेतन मोरे हे तिघे सिंहगड परिसरात फिरण्यासाठी गेले होते. तिघांनीही एका हॉटेलमध्ये जेवण केलं. त्यानंतर तिघेही खडकवासला धरणाच्या पाण्याजवळ गेले. मित्रांवर इम्प्रेशन पाडण्यासाठी तेजसने त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलातून गोळीबार केला होता. हा सगळा प्रकार वेटरच्या लक्षात आला. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून पोलिसांत माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहचले मात्र तोपर्यंत तिघेही पोलीस येण्यापूर्वी फरार झाले होते. त्यानंतर गाडीचा नंबर असल्याने तिघांनाही पोलीसांनी पकडलं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. मित्रांवर इम्प्रेशन पाडण्यासाठी तेजसने त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलातून गोळीबार केल्याचं समोर आलं होतं.
इतर महत्वाची बातमी-