एक्स्प्लोर

Pune Crime news : बँक संचालक, व्यवस्थापकाच्या संगनमताने शेतकऱ्याची कोट्यवधीची फसवणूक; बांधकाम व्यावसायिकांसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल

कराराप्रमाणे जमीन मालक शेतकऱ्याला पैसे न दिल्याने तीन बांधकाम व्यवसायिक, बँक संचालकासह एकूण सात जणांविरोधात हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime News : जमीन विकसित करण्याचा करारनामा करूनही (Pune Crime)  जमीन मालकाच्या नावे बोगस बँक खाते उघडून त्यामध्ये कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केले आणि कराराप्रमाणे जमीन मालक शेतकऱ्याला पैसे न दिल्याने तीन बांधकाम व्यवसायिक, बँक संचालकासह एकूण सात जणांविरोधात हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना जमीन विकसित करण्याची स्वप्ने दाखवून फसवणूक करण्याचे प्रमाण पुण्यात वाढले आहे. डीएसके, मार्वल, नंतर व्हिपीटी कंपनीचा प्रकार समोर आल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कॅन्टोन्मेंट न्यायालयाने दिले होते.

भूषण पारलेशा, निलेश पालरेशा, विलास थनमल पारलेशा (तिघे रा. व्हिटीपी हाऊस फिनेक्स मल जवळ, नगर रोड), संजय मुकुंद लेले, संचालक खासगी सहकारी बँक, भवानी पेठ, नरेश दत्तू मित्तलू व्यवस्थापक, सहकारी बँक, रणवीत गिल रा. मुंबई असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. मूळ जमीन मालक शेतकरी राहुल तुपे रा. अन्सारी फाटा, मांजरी बुद्रुक, हडपसर यांनी यासंदर्भात हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

यासंदर्भात हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व्हीटीपी कंपनीचे भागीदार भूषण पारलेशा आणि त्यांचे भाऊ निलेश पारलेशा यांनी राहुल तुपे यांची जमीन पाहिली आणि ती विकसित करण्यासाठी त्यांच्यात 2014 साली करारनामा झाला. करारनामानुसार तुपे यांच्या मिळकतीवर अर्बन बॅलन्स या नावाने प्रकल्प चालू करण्यात आला या प्रकल्पात एक अकरा मजली व दुसरी 12 मजली इमारत बांधण्याचे ठरले कराराप्रमाणे पालरेशा बंधू या दोन इमारती बांधणार होते. 

इमारतीमध्ये ग्राहकांनी बुकिंग केलेल्या रकमेपैकी 41.18% हे राहुल तुपे यांना आणि 58.82% व्हीटीपी अर्बन प्रोजेक्ट या कंपनीला वाटून घेण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे जनता सहकारी बँक शाखा भवानी पेठ येथे खाते खोलण्यात आले. व्हीटीपी अर्बन प्रोजेक्ट पुणे एलएलपी अर्बन बॅलन्स नावाने कलेक्शन अकाउंट दोघांच्या संमतीने काढले होते, या खात्यावर दोघांच्या सह्या होत्या व करारानुसार खात्यावर टक्केवारीनुसार रक्कम जमा होत होती, डेव्हलपमेंट एग्रीमेंट मध्ये असणाऱ्या वीस अटी व शर्ती या दोघांना बंधनकारक असताना व्हीटीपी कंपनीच्या पालरेशा बंधूंनी काही दिवस ठरल्याप्रमाणे रक्कम तुपे यांच्या खात्यावर जमा केली.

दरम्यान, जुलै 2016 मध्ये जनता सहकारी बँक शाखेतील राहुल तुपे यांचे खाते तपासले असता त्यांच्या लक्षात आले की रकमा दुसऱ्याच खात्यावरती जमा होत आहेत. एका सहकारी बँकेचे संचालक संजय मुकुंद लेले, मॅनेजर नरेश दत्तू मित्तल व व्हीटीपी अर्बन प्रोजेक्टचे भागीदार भूषण पालरेशा, निलेश पालरेशा विलास थर्मल पालरेशा यांनी आपापसात संगनमत करून चेक बुक देण्याची सुविधा नसताना चेक बुक दिले ग्राहकांचे पैसे बँकेचे संचालक आणि व्यवस्थापकाच्या मदतीने काढून घेऊन जमीन मालक राहुल तुपे यांची फसवणूक केली.

व्हीटीपी अर्बन प्रोजेक्टचे तिघा भागीदारांनी फ्लॅट धारकाकडून कोट्यावधी रक्कम जमा केले व करारानुसार तुपे यांच्या हिश्याचे पैसे त्यांना वर्ग केले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच राहुल तुपे यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, यामध्ये बँकेचे संचालक व शाखा व्यवस्थापक यांचाही समावेश आहे. पुढील तपास हडपसरचे पोलीस करत आहेत. यासंदर्भात न्यायालयात जेष्ठ वकील हर्षद निंबाळकर यांनी केस दाखल केली होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar On Eknath Shinde : आता भाजपला एकनाथ शिंदेंची  गरज संपली- विजय वडेट्टीवारABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 05 PM 20 January 2025Maharashtra Guardian Minister News : पालकमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपत धुसफूस? गोगावले, भुसेंच्या नाराजीनंतर शिंदेंचा फडणवीसांना फोन?Eknath Shinde On Naraji : पालकमंत्रिपदाबाबत अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget