Pune Crime News: रात्री पेपर सोडवायला या, गणितात पास करतो; पुण्यात पैसे घेऊन पेपर विकला, प्राध्यापकासह विद्यार्थी अटकेत
Pune Crime News: पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने कारवाई याप्रकरणी कारवाई करत या प्रोफेसरसह चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. परिक्षेत पास करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून 10 ते 15 हजार रुपये घेत असल्याचं समोर आलं आहे.

पुणे: शिक्षणाचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात (Pune Crime News) शिक्षकाने विद्यार्थ्यांना परिक्षेत पास करतो म्हणत लाखो रुपये उकळल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षीचा गणिताचा पेपर पास करून देण्यासाठी पुण्यातील वाघोली भागात असलेल्या पार्वतीबाई गेनबा मोझे या महाविद्यालयातील एका प्रोफेसरने विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलीसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेने कारवाई याप्रकरणी कारवाई करत या प्रोफेसरसह चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. परिक्षेत पास करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून 10 ते 15 हजार रुपये घेत असल्याचं समोर आलं आहे.
प्राध्यापक प्रतिक किसन सातव यासह आदित्य खिलारे, अमोल नागरगोजे, अनिकेत रोडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. प्राध्यापक सातव हा कॉलेजमध्ये दुपारी झालेला पहिल्या वर्षांचा इंजिनियरींगच्या गणिताचा पेपर रात्री कॉलेजमध्ये इंजिनीयरींगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा लिहिण्यासाठी देत होता. आरोपीकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे गणित 2 या विषयाचे लिहिलेल्या उत्तरपत्रिकेचे 6 बंडल तसेच रोख रक्कम 2 लाख 6 हजार रुपये व उत्तरपत्रिका ठेवण्यात आलेल्या कंट्रोल रूमची चावी असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. गणित 2 या विषयामध्ये नापास होण्याची भिती वाटते अशा विद्यार्थ्यांना हेरून त्यांच्याकडून स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी संगनमत करुन 10 ते 50 हजार रुपये मागायचे आणि त्याबदल्यात त्यांना पुन्हा एकदा परिक्षा सोडवायला देत होते.
प्रकरण कसं आलं समोर?
वाघोलीतील बायफ रस्त्यावरील पार्वतीबाई गेणबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांच्याकडून रात्री प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, परीक्षा झाल्यानंतर देखील रात्री परत तेच पेपर विद्यार्थ्यांना लिहण्यासाठी हा प्राध्यापक देत होता. त्यासाठी दहा ते पन्नास हजार रुपयांचा रेट ठेवत होता. दरम्यान, गुन्हे शाखा युनिट-6 च्या पथकाला या टोळीची माहिती मिळाली आणि हा संपूर्ण गैरप्रकार उजेडात आला.याप्रकरणी प्राध्यापकासह विद्यार्थ्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून इंजिनिरिंग मॅथेमॅटिक्स उत्तरपत्रिकेचे सहा बंडल, दोन लाख सहा हजार रुपये, उत्तरपत्रिका ठेवलेल्या कक्षाची चावी, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नापास होण्याची धास्ती; विद्यार्थ्यांना हेरले
या प्रकरणातील मुख्य आरोपी प्राध्यापक प्रतीक सातव आणि साथीदारांनी ज्या विद्यार्थ्यांना गणित- 2 विषयात नापास होण्याची भीती होती अशा विद्यार्थ्यांना त्यांनी हेरलं. सातव आणि साथीदारांनी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 10 ते 50 हजार रुपये घेतले. अभियांत्रिकी महाविद्यालयातील परीक्षा कक्षाची (कंट्रोल रूम) बनावट चावी तयार करून घेतली. या चावीचा वापर करून गणित- 2 विषयाच्या उत्तरपत्रिकांचे सहा सीलबंद बंडल काढून घेतले. विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या उत्तरपत्रिका काढून घेतल्या. उत्तरपत्रिका पुन्हा लिहिण्यासाठी दिल्या होत्या.
Before You Go
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story





















