एक्स्प्लोर

Pune Crime News: डोकं, हात, पाय कापलं अन् धड नदीपात्रात फेकलं; तरुणीचा निर्घृण खून, पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Crime News: खराडी परिसरात जेनी लाईट कन्स्ट्रक्शनचे काम सुरू आहे. या परिसराच्या जवळच असलेल्या नदीपात्रामध्ये एका तरूणीचे हात, पाय आणि डोके नसलेल्या अवस्थेत धड असल्याची माहिती मिळाली होती.

Pune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील खराडी भागात एका अज्ञात तरूणीचा खून करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून नदीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खराडी येथील नदीपात्रात या तरुणीचे धड पोलिसांना आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. खून (Pune Crime News) झालेल्या या तरुणीचे वय अंदाजे 18 ते 30 वर्षे इतके आहे. चंदननगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत प्रकरणी  मिळालेल्या माहितीनुसार, खराडी परिसरात जेनी लाईट कन्स्ट्रक्शनचे काम सुरू आहे. या परिसराच्या जवळच असलेल्या नदीपात्रामध्ये एका तरूणीचे हात, पाय आणि डोके नसलेल्या अवस्थेत धड असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर आता हा सर्व प्रकार उघडकीस आला. मृत तरुणीची ओळख अद्याप पटली नाही. या तरुणीचे वय अंदाजे 18 ते 30 इतके आहे. 

पोलिसांनी या घटनेबाबत वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, अज्ञात इसमाने तरूणीला ठार (Pune Crime News) मारून याबाबत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे धडापासूनचे शीर, दोन्ही हात खांद्यापासून, दोन्ही पाय खुब्यापासून धारदार शस्त्राच्या साह्याने कापून टाकले. त्यानंतर हे धड (Pune Crime News) मुळा-मुठा नदीपात्रात फेकून दिले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

रेनकोटच्या वादातून बीडच्या डिलिव्हरी बॉयने मित्राला चाकू भोसकून संपवलं

पुण्यात रेनकोटवरून झालेल्या वादातून (Pune Crime) डिलिव्हरी बॉयने मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन डिलिव्हरी बॉयमध्ये झालेला वादाचे रूपांतर खूनामध्ये झालं आहे. रेनकोटवरून झालेल्या वादात मित्राने पोटात चाकू खुपसून (Pune Crime) खून केला. पुण्यातील सिंहगड रोड भागातील नऱ्हे परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. 

आदित्य वाघमारे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सुरेश भिलारे या तरुणाला खून प्रकरणात सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य आणि सुरेश हे दोघे मित्र असून सकाळी एका पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये काम करतात आणि संध्याकाळी एका शॉपिंग वेबसाईटसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. दोघं मूळचे बीड जिल्ह्याचे असून गेल्या एक महिन्यापासून एकमेकांच्या ओळखत होते.

काल दुपारी त्या दोघांमध्ये रेनकोट वरून वाद झाला. हा वाद मिटवण्यासाठी त्या दोघांनी रात्री नऱ्हे भागात भेटण्यासाठी ठरवलं. रात्री 10.30 वाजता ते दोघे भेटले मात्र वाद मिटण्याच्या ऐवजी त्यांच्यात अजून वादावादी झाली. दरम्यान, भिलारेने त्याच्याकडील चाकू (Pune Crime) वाघमारेच्या पोटात खुपसला. या हल्ल्यात वाघमारे जखमी झाला आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP MajhaAmit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चाBalasaheb Thorat on CM : मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, बाळासाहेब थोरातांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Embed widget