एक्स्प्लोर

सारथीची बैठक समाधानकारक, 12 महत्वाच्या मागण्या मान्य केल्याची संभाजीराजे छत्रपतींची माहिती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतची सारथीची बैठक समाधानकारक झाली असून 12 महत्वाच्या मागण्या मान्य केल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. पुण्यात सक्रिट हाऊसला ही बैठक पार पडली आहे.

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार छत्रपती संभाजीराजे, मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक आणि सारथी संस्थेचे संचालक मंडळ यांची नवीन सर्किट हाऊस येथे बैठक पार पडली आहे. सारथी संस्थेसंदर्भात समाधानकारक चर्चा झाली असून सरकारने आपल्या महत्वाच्या 12 मागण्या मान्य केल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

मराठा समाजाच्या मूक आंदोलनाची दखल घेऊन आज सारथी संस्थेविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत समाजाच्या सारथी संबंधी प्रमुख बारा मागण्यांपैकी बहूतांश मागण्या पूर्णतः मान्य करून घेण्यात आल्या आहेत. सारथी संस्थेला पूर्णतः स्वायत्तता असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी या बैठकीत पुनश्चः स्पष्ट केल्याचे संभाजीराजेंनी सांगितलं. राज्यात सारथीची आठ विभागीय कार्यालये सुरू करण्यास मंजूरी देण्यात आली असून कोल्हापूर येथे उपकेंद्र सुरू करण्यासाठी नियोजित जागेची पाहणी करून अहवाल देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना या बैठकीत निर्देश दिले.

प्रमुख शैक्षणिक शहरांच्या ठिकाणी सारथीच्या माध्यमातून वसतीगृह उभारणी, सारथीमधून प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून कर्जपुरवठा, प्रशिक्षण, संशोधन यांसाठी नवनवीन उपक्रम राबविण्याची मागणी आपण मान्य करून घेतली.

सारथी लाभार्थीसाठी उत्पन्न मर्यादा 8 लाख असून त्यात 1 लाखाच्या आत, 3 लाखाच्या आत, 3 ते 5 लाखाच्या आत व 5 ते 8 लाखाच्या आत असे टप्पे तयार करून अभ्यासक्रम निहाय सारथी कडून देण्यात येणारे विद्यावेतनाची टक्केवारी ठरविण्यात येईल, जेणेकरून जास्तीतजास्त गरीब विद्यार्थ्यांना अधिकाधिक लाभ मिळू शकेल, यादृष्टीने निर्णय घेण्यात आला.
सारथी प्रशासनासाठी आवश्यक असणारी पदे तात्काळ भरण्याचे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्री यांनी दिले. तसेच, तारादूत प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यासंबंधी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.  याचबरोबर, सारथीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीग्रंथाची छपाई करून त्याचे तात्काळ वितरण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच आपण मागणी केलेल्या 1000 कोटी रूपयांच्या निधीबाबत मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत बैठक घेऊन 20 दिवसांत अंतिम निर्णय घेण्यात येईल असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

याचबरोबर, समाजाच्या वतीने मी मांडलेल्या सूचनांनुसार सारथीसंबंधीत इतर प्रलंबित विषय त्वरीत मार्गी लावून तळागाळातील मराठा समाजासाठी सारथी संस्था पूर्ण क्षमतेने कार्यान्वीत करावी, या मागणीसही सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना तसे निर्देश देण्यात आले, असल्याचे संभाजीराजेंनी सांगितले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणीWankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget