एक्स्प्लोर

Sushma Andhare: पुण्यातील धनिकपुत्रासोबत मद्यपान करणारी इतर पोरं कुणाची, आमदाराचा काय संबंध; सुषमा अंधारेंचं बोट नेमकं कुणाकडे?

Pune Crime News: अजय तावरे हा रक्ताचे नमुने बदलणे, यापुरते मर्यादित नाहीत. गेल्या दहा वर्षात तावरेंनी काय-काय पाहिलं, मंत्रालयाचा सहाव्या मजल्यावर सत्ता बदलावेळी काय घडलं हे सगळं तावरेंकडून समोर येऊ शकतं, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.

पुणे: कल्याणीनगर परिसरात झालेल्या अपघातापूर्व विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलासोबत पबमध्ये मद्यप्राशन करताना काहीजण होते. हे सर्वजण कोण होते? याची माहिती पोलिसांकडून का लपवली जात आहे, असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला. त्या बुधवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी पुणे अपघाताच्या (Pune Car Accident) तपासाबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. या संपूर्ण प्रकरणात पुण्यातील बड्या राजकीय असामींचा संबंध असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. 

 सीसीटीव्ही फुटेजमध्ये या सगळ्यांचे चेहरे ब्लर दिसत आहेत. हे सर्वजण अल्पवयीन असल्याने कदाचित त्यांचे चेहरे व्हीडिओत ब्लर केले असतील. पण पोलिसांकडे या सगळ्यांची माहिती असेल ना? व्हीडिओत ब्लर केलेले चेहरे कोणाचे आहेत? ते कोणत्या बड्या व्यक्तीशी संबंधित आहेत का? त्यांचा वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे का? विशाल अग्रवाल यांच्यासोबत असणारा मुलगा कोणत्या आमदाराचा मुलगा आहे का? मग त्या आमदाराशी सुनील टिंगरे यांचा काय संबंध, अशा प्रश्नांची सरबत्ती सुषमा अंधारे यांनी केली. 

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 18 जीव गेले, पण तीन दिवसांत चर्चा संपली. डोंबिवलीच्या स्फोटात 10 कामगार गेले पण त्याची चर्चाही दीड दिवसांत संपली. पण पुण्यातील ग्लॅमरस अपघात प्रकरणाची चर्चा अनेक दिवस सुरु आहे. अपघाताच्या रात्री पुण्यातील बडी प्रस्थं पोलीस ठाण्यात का दाखल झाली होती, असा सवालही सुषमा अंधारे यांनी विचारला.

सुषमा अंधारेंची गृहमंत्री फडणवीसांवर टीका

पुण्यातील अपघात प्रकरणाचा माग काढण्यासाठी मोबाईल फोनचे सीडीआर तपासणे, ही गृहखात्याची जबाबदारी आहे. सगळंच मी करायचं असेल तर गृहमंत्रीपदाची जबाबदारी माझ्याकडे द्या.  मी अजय तावरेंशी कोण-कोण बोललं हे समोर आणते.  सुनील टिंगरे खोटं बोलले, शिफारस पत्राने हे सिद्ध झालं. नेहमी एका आमदारांची चर्चा या प्रकरणात होते, याकडे सुषमा अंधारे यांनी लक्ष वेधले. 

विरोधकांनी राजकारण करू नये, हे सांगण्यात देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही वेळ का घालवता? पोर्शे अपघात प्रकरणी इथं येऊन का खुलासा करत नाही? विरोधकांनी काय करावं यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी काय करावं हे त्यांनी सांगावं, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले.

आणखी वाचा

मोठी बातमी : सुषमा अंधारेंनी अखेर सुनील टिंगरेंचं नाव घेतलं, पोर्शे अपघातातप्रकरणात आरोपांची वात पेटवली!

महत्त्वाच्या बातम्या

Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Embed widget