Pune Bypoll election : हेमंत रासने की रविंद्र धंगेकर?; प्रचारासाठी कसब्यात कोणत्या उमेदवाराने केला जास्त खर्च
प्रचार आणि निवडणूक म्हटलं की पैशांचा नुसता पाऊस असतो मात्र कसब्यातील भाजप आणि कॉंग्रेसच्या उमेदवारांनी निवडणुकीत फार कमी पैसे खर्च केल्याचं समोर आलं आहे.
Pune Bypoll election : पुण्यात कसबा आणि (Pune Bypoll Election)चिंचवड मतदरसंघासाठी आज मतदान पार पडत आहे. कालपर्यंत प्रत्येक पक्षाने जोरदार प्रचार केला. प्रचारासाठी लाखो रुपयांनी उधळण केली. प्रचार आणि निवडणूक म्हटलं की पैशांचा नुसता पाऊस असतो मात्र कसब्यातील भाजप आणि कॉंग्रेसच्या उमेदवारांनी निवडणुकीत फार कमी पैसे खर्च केल्याचं समोर आलं आहे.
पैसे वाटपाचे आरोप होत असताना विरोधी पक्षांनी एकमेकांवर या गैरव्यवहाराचे आरोप केले गेले. त्यामुळे कसब्यात रविंद्र धंगेकरांनी उपोषण केलं. त्यासोबतच एकमेकांवर टीकेचे ताशेरे ओढले. मात्र जर खर्च पाहिला तर त्यात फक्त दोन्ही उमेदवार मिळून 20,54,205 रुपये खर्च केला आहे. अधिकृत उमेदवारांमध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी 11, 60, 029 रुपये तर भाजपचे हेमंत रासणे यांनी 8, 94, 176 रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. दोन्ही निवडणूक खर्चाच्या कमाल मर्यादेपेक्षा हा खर्च खूपच कमी आहेत. निवडणूक निरीक्षक उमेदवार आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रत्येक उमेदवाराच्या खर्चाच्या पडताळणीचे तीन टप्पे घेत आहेत.
या निवडणुकीत 16 उमेदवार आहेत. या सोळाही उमेदवारांनी प्रचारादरम्यान फक्त 25 लाख 97 हजार 427 रुपये खर्च केल्याचे प्रत्यक्ष खर्च आणि अनिवार्य कमाल मर्यादा यांच्यात मोठी तफावत असल्याचे दिसून येते. अधिकृत उमेदवारांमध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी रु. 11, 60, 029, तर भाजपचे हेमंत रासणे यांनी रु. 8, 94, 176, दोन्ही निवडणूक खर्चाच्या कमाल मर्यादेपेक्षा खूपच कमी आहेत. . मतदारसंघातील प्रचार खर्चाची जबाबदारी असलेल्या नंदा हंडाळ यांच्या म्हणण्यानुसार, निवडणूक निरीक्षकांच्या सूचनेनुसार पडताळणी पूर्ण झाली आहे.
कोणत्या उमेदवाराने किती खर्च केला?
रवींद्र धंगेकर, काँग्रेस, रु. 11, 60, 029
हेमंत रासणे, भाजप, रु. 8, 94, 176
आनंद दवे, अपक्ष, रु. 1, 45, 719
बलजितसिंग कोचर, प्ररिपा, रु. 78,000
संतोष चौधरी, अपक्ष, रु. 75, 889
तुकाराम डफळ, साईस्पा, रु. 29,177
रवींद्र वेदपाठक, रामपा, रु. 41, 2020
अजित इंगळे, अपक्ष, रु. 5,353
अनिल हातगळे, अपक्ष, रु. 26, 309
अभिजित आवाडे-बिचुकले, अपक्ष, रु. 5,300
अमोल तुजारे, अपक्ष, रु. 11,333
खिसाल जाफरी, अपक्ष, रु. 37,500
चंद्रकांत मोटे, अपक्ष, रु. 5,656
रियाझ सय्यद, अपक्ष, रु. 28,000
सुरेशकुमार ओसवाल, अपक्ष, रु.30,270
हुसेन शेख, अपक्ष, रु. 23,801