एक्स्प्लोर

Pune Bypolle election : शक्तीप्रदर्शन, घरोघरी भेटी अन् प्रचारयात्रा; शेवटच्या दिवशी चिंचवडमध्ये तीनही उमेदवारांकडून प्रचाराचा धुराळा

चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे या तिघांनी धुमधडाक्यात प्रचार केला.

Pune Bypolle election : चिंचवड पोटनिवडणुकीच्या  (Pune Bypoll Election) प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या अश्विनी जगताप (Ashwini jagtap), महाविकास आघाडीचे नाना काटे (nana kate) आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (rahul kalate) या तिघांनी धुमधडाक्यात प्रचार केला. अश्विनी जगताप यांनी पदयात्रा काढत मतदारांशी संवाद साधला. नाना काटे यांनी घरोघरी जाऊन लोकांच्या भेटी घेतल्या तर संपूर्ण प्रचारादरम्यान कायम मतदारांच्या भेटी घेणाऱ्या राहुल कलाटे यांनी शेवटच्या दिवशी मात्र शक्तीप्रदर्शन केलं.  

राहुल कलाटेंचं शक्ती प्रदर्शन

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात बंडखोर राहुल कलाटेंनी पहिल्या दिवसापासून गाठीभेटीवर भर दिला होता. मात्र शेवटच्या काही तासांत त्यांनी शक्तीप्रदर्शनावर भर दिला. सायंकाळी सहापर्यंत ते रॅली काढून मतदारांपर्यंत पोहचणार आहेत. विशेष म्हणजे त्यांनी ही दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या चेहऱ्याचा प्रचारात आधार घेतला. मतदार निवडून देतील असा विश्वास त्यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केला आहे. 

नाना काटेंसाठी आठ दिवस अजित पवार मैदानात

चिंचवड विधानसभेत प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ही नाना काटे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीकडून अजित पवार मैदानात आहेत. त्यांच्या प्रमाणेच उमेदवार नाना काटे हेही घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. 2017 साली पालिकेच्या सत्ता हाती घेताना भाजपने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे आता जनता माझ्या बाजूने आहे, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला आहे. त्यासोबतच चिंचवड विधानसभा पुन्हा काबीज करण्यासाठी विरोधीपक्ष नेते अजित पवार प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचार सभा अथवा रॅली न काढता, त्यांनी घरोघरी जाऊन भेटी घेण्यावर भर देत आहेत. स्थानिकांना भेटून ते राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. गेला आठवडाभर अजित पवार चिंचवड विधानसभेत ठाण मांडून आहेत. दिवंगत लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगतापांचा पराभव करण्यासाठी ते जंगजंग पछाडताना पाहायला मिळत आहे. भाजपकडून ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांनी टीम मतदारसंघात तैनात केलेली आहे. 

जगतापांची राहिलेली कामं पूर्ण करणार; अश्विनी जगताप

चिंचवड विधानसभेतील मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांच्या हातात सायंकाळी सहा वाजेपर्यंतचा वेळ आहे. त्यामुळं उमेदवारांनी काटेकोर नियोजन केलेलं आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशीदेखील अश्विनी जगताप यांनी प्रचारयात्रा काढून मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी कोणतीही कसर न सोडल्याचं दिसत आहे. अगदी शेवटच्या दिवशी त्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांना सोबत घेत मतदारांच्या भेटी घेत आहेत. लक्ष्मण जगताप यांना चिंचवडकरांसाठी भरपूर कामं करायची होती. मात्र त्यांच्या आजारपणामुळे ते काही कामं करु शकले नाहीत त्यांची राहिलेली कामं पूर्ण करणार असल्याचं त्या म्हणाल्या.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,सुधीरभाऊंचा बंगला 1000 कोटीचा, मुनगंटीवारांना दिली ऑफर, कितीला विकत घेता?
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,सुधीरभाऊंचा बंगला 1000 कोटीचा, मुनगंटीवारांना दिली ऑफर, कितीला विकत घेता?
अजित दादांनी झापलं, शेकडो कोटींचं कंत्राट रद्द करण्यावरुन वाद; रोहित पवारांनी सांगितला बारामतीतील किस्सा
अजित दादांनी झापलं, शेकडो कोटींचं कंत्राट रद्द करण्यावरुन वाद; रोहित पवारांनी सांगितला बारामतीतील किस्सा
Share Market : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले

व्हिडीओ

Manoj Jarange Patil : सातारा,मिरज,कोल्हापूर संस्थानचे गॅझेटिअर लागू करा अन्यथा, मनोज जरांगेंचा इशारा
Babanrao Taywade Nagpur : ओबीसींची जनगणना जातीनिहाय व्हावी, बबनराव तायवाडे यांची मागणी
Gosekhurd Dam Issue : गोसेखुर्द बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान? Special Report
Sambhajinagar Phulambri : इंग्रजी शाळेतलं भयंकर कृत्य, संभाजीनगर हादरलं Special Report
Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,सुधीरभाऊंचा बंगला 1000 कोटीचा, मुनगंटीवारांना दिली ऑफर, कितीला विकत घेता?
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,सुधीरभाऊंचा बंगला 1000 कोटीचा, मुनगंटीवारांना दिली ऑफर, कितीला विकत घेता?
अजित दादांनी झापलं, शेकडो कोटींचं कंत्राट रद्द करण्यावरुन वाद; रोहित पवारांनी सांगितला बारामतीतील किस्सा
अजित दादांनी झापलं, शेकडो कोटींचं कंत्राट रद्द करण्यावरुन वाद; रोहित पवारांनी सांगितला बारामतीतील किस्सा
Share Market : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले
Nashik News: नाशिकमध्ये भुताचा वावर, सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ व्हायरल, नागरिकांनी रात्रीच्या वेळी गस्त घातली अन्...; नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये भुताचा वावर, सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ व्हायरल, नागरिकांनी रात्रीच्या वेळी गस्त घातली अन्...; नेमकं काय घडलं?
Gold Silver Rate : सोने 1175 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 5835 रुपयांनी घसरले; जाणून घ्या 22 कॅरेट,24 कॅरेट सोन्याचे दर 
सोने 1175 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 5835 रुपयांनी घसरले; जाणून घ्या 22 कॅरेट,24 कॅरेट सोन्याचे दर 
फरहान अख्तरला 40 कोटी तर दूर, एक पैसाही देणार नाही; ‘डॉन 3’ प्रकरणात रणवीर सिंहचा पलटवार, म्हणाला...
फरहान अख्तरला 40 कोटी तर दूर, एक पैसाही देणार नाही; ‘डॉन 3’ प्रकरणात रणवीर सिंहचा पलटवार, म्हणाला...
Nagpur Accident News: रस्त्याच्या कडेवर उभ्या असलेल्या दुचाकीमुळे 17 प्रवाशांचे वाचले प्राण; नागपुरात एसटी बसचा विचित्र अपघात
रस्त्याच्या कडेवर उभ्या असलेल्या दुचाकीमुळे 17 प्रवाशांचे वाचले प्राण; नागपुरात एसटी बसचा विचित्र अपघात
Embed widget