पुणे लोकसभा संदर्भात मोठी अपडेट, निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयात जाणार
Pune By Election : पुणे लोकसभा पोटनिवडणूक घेण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं निवडणूक आयोगाला दिले आहेत. याविरोधात निवडणूक आयोगात सुप्रीम कोर्टात अपील करण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या या निर्णयाला जर सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली तर पोटनिवडणूक होणार नाही, थेट लोकसभा निवडणुकीतच पुणे मतदारसंघाचा खासदार निवडला जाईल.
Pune By Election : पुणे लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी (Pune By Election) निवडणूक आयोगाने 10 महिन्यात काहीच का हालचाली केल्या नाही, खासदारांच्या निधनानंतर एवढ्या महिने जागा रिक्त ठेवणे अयोग्य, लवकरात लवकर पोटनिवडणूक घ्या, असे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले. मुंबई हायकोर्टाच्या निर्णायाच्या विरोधात निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे लोकसभा पोटनिवडणूक होण्याची शक्यता कमीच आहे. खासदार गिरीश बापट (Girish bapat) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभा पोटनिवडणूक अद्याप झाली नाही. त्याबाबत आज मुंबई हायकोर्टाने निवडणूक आयोगाला झापले. हायकोर्टाच्या आदेशाविरोधात निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.
विद्यमान लोकसभेचा कालावधी 17/06/2019 ते 16/06/2024 असा आहे. आज उच्च न्यायालयाने पुणे लोकसभा पोट निवडणूक घेण्याचे आदेश आयोगाला दिले आहेत. मात्र सदर निकाला विरुद्ध केंद्रीय निवडणूक अयोग्य सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची शक्यता आहे. या निर्णयास स्थगिती दिल्यास पोट निवडणूक होऊ शकणार नाही तसेच अंतिम निकालास विलंब लागू शकतो. यादरम्यान लोकसभा कालावधी 6 महिन्यांच्या आत कालावधी राहिल्यास पोट निवडणूक घेता येत नाही, हा नियमान्वये देखील पोट निवडणूक होण्याची शक्यता धूसर आहे.
उच्च न्यायालयाने आदेश दिला त्यास केंद्रीय निवडणूक अयोग अपील करण्याची शक्यता आहे. जर केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात अपील केले नाही तर पोट निवडणूक होऊ शकते. तसेच अपील करून स्थगिती दिली नाही तरी देखील पोट निवडणूक होऊ शकते.
कसबा निवडणुकीतून भाजप धडा घेणार?
आमदार मुक्ता टिळकांच्या निधनानंतर टिळक कुटुंबीयांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे टिळक कुटुंब नाराज झालं. याचा फटका भाजपला चांगलाच बसला. भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे ब्राह्मण समाज नाराज झाला, परिणामी भाजपला होणारं मतदान कमी झालं. चुकीचा उमेदवार दिल्याने किंवा टिळकांच्या घरात उमेदवारी न दिल्याने भाजपला बालेकिल्ला गमवावा लागला. त्यामुळे आता बापटांच्या निधानानंतर भाजपला उमेदवार निवडीचं मोठं आव्हान असणार आहे. भाजपकडून उमेदवारांसाठीती चाचपणी सुरु झाली आहे. काही नावांची चर्चादेखील आहे. मात्र जर यंदा बापटांच्या घरात उमेदवारी दिली नाही तर पुन्हा एकदा पराभव होण्याची भीती भाजपला असण्याची शक्यता आहे.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येही तू तू मैं मैं
दुसरीकडे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये देखील ही जागा लढवण्यावरुन तू तू मैं मैं पाहायला मिळत आहे. वर्षानुवर्ष कॉंग्रेसकडून लढवण्यावरुन येणारी ही जागा आम्हीच लढवणार असं कॉंग्रेस नेते म्हणत आहे. तर पुणे शहरात आमची ताकद वाढल्याने ही आम्हाला मिळायला हवी, असा दावा राष्ट्रवादीचे नेते करताना दिसत आहे. महाविकास आघाडी अस्तित्वात आली असून सत्ता न मिळाल्यास ती अस्तित्वात राहणार नाही, असा दावा भाजपकडून करण्यात येत आहे.