Pune Bullet News : पुण्यातील रस्त्यावर बुलेटच्या सायलेन्सरचा 'भोंगा'; 3 दिवसात 619 "बुलेट राजांवर" कारवाई
पुण्यात अवघ्या 3 दिवसात 619 "बुलेट राजांवर" पोलिसांनी कारवाई केली आहे.
पुणे : पुण्यात गाड्यांच्या (bullet) बाबतीत हौशी कलाकारांची काही कमतरता नाही. याच हौशी गाडी चालकांवर आता पुण्यातील वाहतूक विभागातील पोलिसांची करडी नजर असणार आहे. पुण्यातील विविध परिसरात आता हौशी बुलेट चालकांवर कारवाई (Traffic Police) करण्यात येत आहे. पुण्यातील विविध परिसरातील नागरिकांनी या संदर्भात तक्रारी दिल्याची माहिती आहे. पुण्यात अवघ्या 3 दिवसात 619 "बुलेट राजांवर" पोलिसांनी कारवाई केली आहे.
बुलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरबदल करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांवर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारलाय आहे. गेल्या तीन दिवसांत विशेष मोहीम राबवून 619 दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे. सर्वाधिक कारवाई पुण्यातील मुंढवा परिसरात करण्यात आली असून या ठिकाणी 85 दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे.
सिंहगड रोड पोलिसांनी परिसरातदेखील बुलेट मोटारसायकलींवर कारवाई करत त्यांच्या वाहनांचे सायलेन्सर जप्त केले आहेत. आवाज निर्माण करणारे मॉडिफाइड सायलेन्सर बसविणाऱ्या 33 बुलेट बाईक चालकांवर कडक कारवाई करण्यात आली. सिंहगड रोड पोलिसांनी वडगाव पुलाखाली बुधवारी रात्री आठ ते गुरुवारी सकाळी सहा वाजेपर्यंत नाकाबंदी केली असून या कारवाईत 117 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट ड्रायव्हिंग, विनापरवाना वाहन चालविणे, बुलेट मोटारसायकलवरील अनधिकृत सायलेन्सर सुधारणेसह विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही वाहने जप्त करण्यात आली. मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकूण 33 बुलेट चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.मोटार वाहन कायद्याच्या कलम 207 नुसार सुधारित सायलेन्सर बसविलेली 11 वाहने जप्त करण्यात आली.
कारवाई सुरुच राहणार!
मोठा आवाज करणाऱ्या सायलेंसरवर आणि दादा, भाई, लव्ह असे शब्द लिहून परिसरात दहशत पसरवत असलेल्या सायलेंसरच्या चालकावरदेखील कारवाई करण्यात येणार असल्याचं वाहतूक विभागाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे बुलेट चालवून शहरात हवा करणं महागात पडणार आहे. त्यामुळे ज्यांच्या गाडीला अशा प्रकराचे आवाज करणारे सायलेंसर असतील तर त्यांनी साधे सायलेंसर बसवून घ्यावेत, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. बुलेटला वेगळा सायलेन्सर बसवतात. त्यामुळे शहरातील अनेक भागात ध्वनी प्रदूषण होतं. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ध्वनी प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासोबतच वायु प्रदूषणाचा प्रश्नदेखील कायम आ वासून उभा असतो. त्यामुळे कारवाई करत आहेत.
इतर महत्वाची बातमी-