एक्स्प्लोर

पुण्यात संशयित दहशतवाद्याला अटक, एटीएसची कारवाई

हरपालसिंग प्रतापसिंग नाईक असं या 42 वर्षीय संशयिताच नाव आहे. मूळचा पंजाब येथील रोपर जिल्ह्यातील असून सध्या तो कर्नाटकातील बेल्लारी येथे राहत होता. स्वतंत्र खलिस्तान निर्मितीचा तो पुरस्कर्ता आहे. पुणे दहशतवाद विरोधी पथक अर्थात एटीएसने 2 डिसेंबरला चाकण येथून त्याला अटक केली होती.

पिंपरी-चिंचवड : देशांतर्गत तसेच पाकिस्तानसह विदेशातील दहशदवादी विचारसरणीच्या लोकांच्या संपर्कात असलेल्या एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. पुण्याच्या चाकणजवळ पुणे दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. तर त्याच्या एका साथिदाराला पंजाबमध्ये अटक करण्यात आली आहे. हरपालसिंग प्रतापसिंग नाईक असं या 42 वर्षीय संशयिताच नाव आहे. मूळचा पंजाब येथील रोपर जिल्ह्यातील असून सध्या तो कर्नाटकातील बेल्लारी येथे राहत होता. स्वतंत्र खलिस्तान निर्मितीचा तो पुरस्कर्ता आहे. पुणे दहशतवाद विरोधी पथक अर्थात एटीएसने 2 डिसेंबरला चाकण येथून त्याला अटक केली होती. देशी बनावटीचे पिस्तुल आणि 5 जिवंत काडतुसं त्याच्याकडून जप्त करण्यात आली होती. मात्र या अटकेची गुप्तता पाळण्यात आली होती. 3 डिसेंबरला न्यायालयाने हरपालसिंगला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याला आज पुन्हा न्यायालयात हजर केल्यानंतर चौकशीत समोर आलेल्या अनेक धक्कादायक बाबी एटीएसने मांडल्या. हरपालसिंग त्याच्या साथीदारांच्या मदतीने दहशतवाद्यांची टोळी बनवून देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण करण्याच्या तयारीत होता. त्यासाठी तो दहशतवादी कृत्याच्या तयारीत होता. हरपालसिंग इंटरनेट आणि सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करुन देशातील तरुणांना दहशतवादी कारवाया करण्यास भडकवत असे. तसेच याचाच शस्त्र जमावण्यास वापर करायचा. पाकिस्तान आणि विदेशातील दहशतवादी विचारसरणी असलेल्यांच्या संपर्कात असल्याचा दाट संशय आहे. त्यामुळेच न्यायालयाने आज त्याच्या पोलीस कोठडीत सात दिवसांची वाढ केली. दुसरीकडे पंजाबच्या सरहद पोलीसांनी मोईन नावाच्या त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. लवकरच पुढील कारवाईसाठी पुणे एटीएस त्याला ताब्यात घेणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget