एक्स्प्लोर

पुणे-पिंपरीतील वाहतूक कोंडीमुळे दिवसाला 25 कोटींचं नुकसान

जगाच्या नकाशावर आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीची वाहतूक कोंडीमुळे जगातील आयटी इंडस्ट्रीतील इमेज ढासळली आहे.

पिंपरी चिंचवड : वाहतूक कोंडीमुळे अधिकचा प्रवास करावा लागणे, पेट्रोल-डिझेल वाया जाणे, प्रदूषण वाढणे अशा अनेक समस्या तुम्ही आजवर ऐकल्या असतील. पण या वाहतूक कोंडीमुळे दिवसाला 25 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं कधी ऐकलं आहे? पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या वाहतूक कोंडीमुळे हा तोटा झेलावा लागत आहे. जगाच्या नकाशावर आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीची वाहतूक कोंडीमुळे जगातील आयटी इंडस्ट्रीतील इमेज ढासळली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडचे अनेक सिग्नल भेदून हिंजवडीत दाखल होताना या वाहतूक कोंडीमुळे अभियंत्यांची पुरती वाट लागते. गेल्या दहा वर्षात ही परिस्थिती न सुधारल्यामुळे आता परदेशी क्लाएंट्सनेही याची धास्ती घेतली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या विविध भागात राहणारे आयटी अभियंते कंपनीच्या किंवा खाजगी वाहनाने हिंजवडीत दाखल होतात. वेगवेगळ्या मार्गाने येणाऱ्या या अभियंत्यांना भूमकर आणि भुजबळ चौकातून हिंजवडीत प्रवेश करावा लागतो. या दोन्ही चौकातून येणाऱ्या वाहनांची संख्या तब्बल एक लाखाच्या घरात पोहचली आहे. वाहनांची संख्या, अरुंद रस्ते आणि या रस्त्यावरील अतिक्रमण पाहता पुण्याहून येणाऱ्या अभियंत्यांना किमान एक तास तर पिंपरी चिंचवडहून येणाऱ्या अभियंत्यांना किमान अर्धा तास प्रवास करुन कंपनीत पोहचावं लागतं. तर तितकाच प्रवास घरी पोहचण्यासाठी ही करावा लागतो. आयटी अभियंत्यांना हा त्रास भोगावा लागत असताना आयटी कंपन्यांना याच वाहतूक कोंडीमुळे 25 कोटी रुपयांचा प्रत्येक दिवसाला फटका बसतो. सध्या तीन फेजमध्ये विभागलेल्या हिंजवडीत 120 कंपन्यांनी बस्तान मांडलं आहे, त्या कंपन्यांमध्ये दीड लाख आयटी अभियंते काम करतात. या कंपन्या परदेशी क्लाएंट्सना तासाला सरासरी 25 डॉलर देतात. एक डॉलरची भारतीय चलनानुसार कमीतकमी ६५ रुपये धरले तर 25 गुणिले 65 = 1 हजार 625 रुपये या कंपन्या एक तासाला मोजतात   1625 रुपये गुणिले दीड लाख कर्मचारी = 24 कोटी 37 लाख 50 हजार रुपये देतात. वाहतूक कोंडीतला हा एक तास कामी येत नसल्याने कंपन्यांना हा तोटा भोगावा लागतो. वाहतूक कोंडीचा फटका इथंच थांबला नाही. तर परदेशी क्लाएंन्टने या कोंडीची धास्ती घेत त्यांचा मोर्चा परराज्याकडे वळवला आहे. परिणामी सरकारच्या तिजोरीलाही कररुपी तोटा बसत आहे. वाहतूक कोंडीमुळे याआधीही हिंजवडीची प्रतिमा मलीन झाली आहे. गुगलवर हिंजवडीचा मराठीतील अर्थ काय विचारलं असता "ते घरी परतले नाहीत" असं त्याचं उत्तर मिळायचं. विनोदाचा भाग वगळला, तरी आता तर थेट कंपन्यांवर याचा परिणाम होऊ लागला आहे. वेळीच ही वाहतूक कोंडी फोडली नाही तर सरकारचं 'मेक इन महाराष्ट्र'चं स्वप्न अंधारातच राहण्याची चिन्ह आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री अन् पिस्तूल खरेदीचा प्लॅन; गोव्यातून दुचाकीवर पुण्यात आले अन्...., पोलिसांनी सापळा रचून चौघांना केलं अटक, नेमकं काय घडलं?
इन्स्टाग्रामवर मैत्री अन् पिस्तूल खरेदीचा प्लॅन; गोव्यातून दुचाकीवर पुण्यात आले अन्...., पोलिसांनी सापळा रचून चौघांना केलं अटक, नेमकं काय घडलं?
Pune Crime: पुण्यातील पोलीस पाटलाच्या हत्याप्रकरणाला धक्कादायक वळण, भाच्यानेच जमिनीसाठी मामाचा काटा काढला, भोरच्या मौजे सांगवी बुद्रुक गावात नेमकं काय घडलं?
पुण्यातील पोलीस पाटलाच्या हत्याप्रकरणाला धक्कादायक वळण, भाच्यानेच जमिनीसाठी मामाचा काटा काढला, भोरच्या मौजे सांगवी बुद्रुक गावात नेमकं काय घडलं?
Pune News : ऊन घेण्यासाठी गच्चीवर जातो असं सांगून गेले, इमारतीच्या आवारात बॉडी सापडली; पुण्यात निवृत्त लेफ्टनंट जनरल अशोक जोशी यांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
ऊन घेण्यासाठी गच्चीवर जातो असं सांगून गेले, इमारतीच्या आवारात बॉडी सापडली; पुण्यात निवृत्त लेफ्टनंट जनरल अशोक जोशी यांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
Pune Forest Department Scam : झाडं न लावताच साडेबारा कोटींचा चुराडा? पुण्यात वृक्षलागवड घोटाळ्याचा आरोप; रोपं सुकली, बिलं निघाली! नेमकं काय घडलं?
झाडं न लावताच साडेबारा कोटींचा चुराडा? पुण्यात वृक्षलागवड घोटाळ्याचा आरोप; रोपं सुकली, बिलं निघाली! नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Embed widget