Pune Aditya Thackeray : ड्रग्ज, अवैध धंदे, विकासकामं... राज्यात सरकार अस्तित्वात आहे की नाही?; आदित्य ठाकरेंची सरकारवर जहरी टीका
हे सरकार कंत्राटदारांचं आहे की सर्वसामान्याचं आहे?, असा सवाल युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. त्यासोबतच राज्यात सरकार अस्तित्वात आहे की नाही?, असाही हल्लाबोल त्यांनी सरकारवर केला आहे.

पुणे : महाराष्ट्रात (Maharashtra News) कायदा आणि सुव्यवस्थेचा (State Government) प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात सरकारचं सध्या कोणाकडेही लक्ष नाही आहे. पुण्यात (Pune Political News) अनेक ठिकाणी चुकीची कामं सुरु आहेत. या चुकीच्या कामांना सरकार दुजोरा देत असल्याचं दिसत आहे. हे सरकार कंत्राटदारांचं आहे की सर्वसामान्याचं आहे?, असा सवाल युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. त्यासोबतच राज्यात सरकार अस्तित्वात आहे की नाही?, असाही हल्लाबोल त्यांनी सरकारवर केला आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे आज पुणे दौऱ्यावर आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडत आहे. पोलिसदेखील कारवाई करत आहेत. मात्र राजकारणी लोकांचे गुंडासोबतचे फोटो समोर येत आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातली परिस्थिती बिकट होत आहे. विकास काम रखडली आहे. पुण्यातच बघितलं तर मेट्रोचं (Pune Metro) उद्घाटन करण्यासाठी वेळ नाही आहे. त्यासोबतच पुणे विमानतळाचंदेखील (Pune Airport) काम झालं तरी ते सुरु करण्यात येत नाही आहे. सरकारला वेळ आहे की नाही, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
'जे शेतकरी 2 हेलिकॉप्टर घेऊन जातात ते काय शेतकरी'
यासोबतच अदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरदेकील निशाणा साधला आहे. ते म्हणाले की 'मुख्यमंत्री अमावस्या पौर्णिमा कधीतरी शेती करायला जाता घटनाबाह्य मुख्यमंत्री यांना वेळ नाही नक्की भाजपची काय विचारधारा आहे, हे कळत नाही. मात्र जे शेतकरी 2 हेलिकॉप्टर घेऊन जातात ते काय शेतकरी'
पुण्यातील मुळा-मुठा नदीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे पर्यावरण प्रेमींनी यासंदर्भात अनेकदा लोकप्रतिनिधींशी बोलणं केलं आहे. नदी सुधार प्रकल्पासाठी मुळा मुठा नदीचं पात्र कमी करण्यात येत आहे. हा प्रोजक्ट साबरमती नदीवर काम करणाऱ्या एका व्यक्तीला देण्यात आला आहे. मात्र दोन्ही शहरातील परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे अशा प्रोजेक्टमधून गुजरातीचं पोट भरणं सुरु आहे, असाही आरोप त्यांनी केला आहे.
इतर महत्वाची बातमी-
- Ajit Pawar : मी कामाचा माणूस आहे; अजित पवारांचा निशाणा नेमका कोणावर?
- Maratha Reservation : हे फडणवीसांचं षडयंत्र, शिंदे आणि अजित पवारांचे काही लोकही यामध्ये सामील; मराठा आरक्षणावरून जरांगे पाटलांचे गंभीर आरोप
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
