Ajit Pawar : मी कामाचा माणूस आहे; अजित पवारांचा निशाणा नेमका कोणावर?
शिरूर तालुक्यात काही राजकीय घटना घडल्या तिथल्या लोक प्रतिनिधी यांनी धाडसोडी भूमिका घेतली त्यामुळे तेथील कार्यकर्त्यांनी आज पक्षात प्रवेश केल्याचं ते म्हणाले. सोबतच मी कामाचा माणूस आहे, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
इंदापूर पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आज इंदापूरच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवारांचा आजचा इंदापूर दौरा महत्वाचा मानला जातोय. आज अजित पवार इंदापुरात शेतकरी मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. शिरूर तालुक्यात काही राजकीय घटना घडल्या तिथल्या लोक प्रतिनिधी यांनी धाडसोडी भूमिका घेतली त्यामुळे तेथील कार्यकर्त्यांनी आज पक्षात प्रवेश केल्याचं ते म्हणाले. सोबतच मी कामाचा माणूस आहे, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
अजित पवार काय म्हणाले?
अजित पवार काय म्हणाले की, इंदापूरच नाही तर पुणे जिल्ह्यातील पालकमंत्री म्हणून सगळे काम करतो. त्यात सगळी काम होणार याची खात्री करुन घेतो. कामे कशी करायची मला माहित आहे, कारण अंडी पिल्लं आपल्याला माहीत आहे. 40 कोटींचा पुणे जिल्ह्याच्या विकास आराखडा आज 1250 कोटींवर गेला. महाराष्ट्रमध्ये गेलो तर काय चांगलं आहे ते आपल्या भागात आणायचं कसं याचा विचार करतो, मी कामाचा माणूस आहे.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांच्या मतदारसंघात मदत कशी करता येईल असं महाविकास आघाडी सरकारच्या काळात आम्ही बघत होतो. आम्ही जो निर्णय घेतला तो संघटनेच्या आणि तुमच्या पाठबळावर घेतला आहे. विरोधकांमध्ये एक वाक्यता दिसत नाही. सगळ्यांचे चार दिशेला चार तोंड आहे. मतदारांमध्ये खूप ताकद आहे. कुठेही भावनिक होऊ नका. मला सगळ्या गोष्टींची जाण आहे. तुम्हाला कुठल्याही कामासाठी वाऱ्यावर सोडणार नाही. प्रत्येकाचा काळ असतो. चार दिवस सासूचे असले की चार दिवस सूनेचे येतात, आता सासूचे दिवस गेले सूनेचे दिवस आले अर्थात तुम्ही बटण दाबलं तर.. विरोधाला विरोध म्हणून राजकारण करायचे नाही असंही त्यांनी सांगितले.
नरेंद्र मोदींकडे व्हिजन आहे. सकाळपासून उशिरापर्यंत काम करण्याची ताकद आहे. देशात राष्ट्रीय महामार्ग झालेत, पूर्वी असं होत नव्हते.तसेच विकास कामे करणाऱ्या नेतृत्वाला सामान्य जनताच गॅरंटी आहे. हक्काने मोदींना सांगू शकतो. तुमच्या विचारांचा खासदार दिलेला आहे. आता मतदारसंघात हे काम करून द्या असं अजित पवारांनी म्हटलं. वंदे भारत ट्रेन सुरू झालीय. कमी वेळात कुठेही जाता येते. आपला लोकप्रतिनिधी सत्ताधारी पक्षाच्या विचाराचा गेला तर केंद्र सरकार कितीतरी जास्त पटीने निधी देऊ शकते.