Pune Crime News: पाच सेकंदात होत्याचं नव्हतं झालं! सहा वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद.
पिंपरी-चिंचवड शहरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. फॅब्रिकेशन शॉपमध्ये खेळण्याचा मोह एका सहा वर्षीय चिमुकल्याच्या जीवावर बेतला आहे. पॉलिश मशीनला लोंबकळायला गेला आणि ती मशीनच त्याच्या डोक्यावर पडली.
Pune Crime News: पिंपरी-चिंचवड शहरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. फॅब्रिकेशन शॉपमध्ये खेळण्याचा मोह एका सहा वर्षीय चिमुकल्याच्या जीवावर बेतला आहे. पॉलिश मशीनला लोंबकळायला गेला आणि ती मशीनच त्याच्या डोक्यावर पडली. या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झालाय. युवान दौंडकर असं या चिमुकल्याचं नाव होतं. या दुर्दैवी घटनेचा व्हिडीयो सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पिंपळेगुरव येथील नीता फेब्रिकेशन शॉप मध्ये ही धक्कादायक घडली काल घडली.
नेमकं काय घडलं?
फॅब्रिकेशन शॉपमध्ये खेळण्याचा मोह एका सहा वर्षीय चिमुकल्याच्या जीवावर बेतला आहे. पॉलिश मशीनला लोंबकळायला गेला आणि ती मशीनच त्याच्या डोक्यावर पडली. युवानची आई दुचाकी धुण्यासाठी वॉशिंग सेंटरवर आली होती. तेंव्हा त्याच मालकाच्या फेब्रिकेशनच्या शॉपमध्ये ती युवानला घेऊन बसली. युवान आईसोबत खेळत होता. पण अचानक तो पॉलिश मशीनजवळ गेला आणि लोंबकाळू लागला. दुर्दैवाने ती मशीन अधांतरी होती, त्यामुळं पुढच्या क्षणाला ती मशीन युवानच्या डोक्यात पडली. अवघ्या पाच सेकंदात नको ते घडलं. आईने जखमी झालेल्या पोटच्या मुलाला वाचविण्यासाठी तातडीनं रुग्णालयाकडे धाव घेतली, मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. याप्रकरणी सांगवी पोलीस पुढील कारवाई आज करणार आहेत.
सध्या लहान मुलांंच्या बाबतीत होणाऱ्या अपघातांचंं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पालकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. सोशल मीडियावरील व्हिडीयो पाहून लहान मुलं त्याच पद्धतीचं वर्तन करताना दिसतात. त्या व्हिडीयोचा त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे.
कैद्यांप्रमाणे फाशी घेत आठ वर्षीय मुलाची आत्महत्या
पिंपरी-चिंचवडमधील एका आठ वर्षीय मुलाने कैद्याप्रमाणे फाशी घेतली होती. महत्वाचं म्हणजे त्याने स्वत:ला फाशी लावण्यापुर्वी बाहूलीला फाशी लावली होती. त्यानंतर त्याने स्वत:ला फाशी लावून घेत आत्महत्या केली होती. पिंपरी-चिंचवडमधून ही धक्कादायक घटना समोर आली होती. मोबाईलवरील व्हिडीयो पाहून हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता पोलिसांनी दर्शवली होती. पिंपरी-चिंचवडजवळील थेरगाव परिसरात ही घटना घडली होती.