Pune Accident News : भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक; 12 वर्षीय मुलाचा करुण अंत, पुण्यातील घटना
Pune Accident: भरधाव वेगात असलेल्या टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने 12 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला असून, त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. रासे फाटा येथे शनिवारी दुपारी अडीच वाजता हा अपघात झाला.
पुणे : पुण्यात अपघाताच्या संख्येत सातत्याने (Pune Accident) वाढ होत आहे. त्यातच भरधाव वेगात असलेल्या टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने 12 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला असून, वडील गंभीर जखमी झाले आहेत. रासे फाटा येथे शनिवारी दुपारी अडीच वाजता हा अपघात झाला. श्रीमंत भीमा धनवे (वय 39 वर्ष) असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून, त्यांच्या मुलगा राकेश श्रीमंत धनवे (वय 12 वर्ष) याचा अपघातात मृत्यू झाला आहे.
श्रीमंत धनवे शिक्रापूर तालुक्यातील शिरूर येथील रहिवासी आहे. या अपघातात त्यांच्या 12 वर्षाच्या मुलाला जीव गमवावा लागला. या घटनेबाबत श्रीमंत धनवे यांनी चाकण पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. तर, पोलिसांनी बंडू सुदाम धायबर याला ताब्यात घेतले आहे. बंडू धायबर (वय 46) हा शिक्रापूर तालुक्यातील शिरूर येथील रहिवासी असून, तो आयशर टेम्पोचा चालक आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक बंडू धायबर हा आयशर टेम्पो भरधाव वेगाने चालवत होता. शिक्रापूर चाकण रोडने प्रवास करत असताना रासे फाट्यावर आल्यानंतर धायबरच्या टेम्पोने धनवे यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने वडिल आणि मुलगा दोघेही खाली पडले. दुर्दैवाने, मुलाचा जखमी अवस्थेत मृत्यू झाला आणि श्रीमंत धनवे गंभीर जखमी झाले. या घटनेचा तपास चाकण पोलीस करत आहेत.
भरधाव वाहनं घेतायत नाहक जीव
पुण्यात भरधाव टेम्पो आणि टॅंकरचा वेग अनेकांचा जीव घेत असल्याचं समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या अपघातात दोन जुळ्या बहिणींचा करुण अंत झाला होता. विश्रांतीवाडीतील मुकुंदराव आंबेडकर चौकात सिग्नल सुटल्यानंतर दुचाकीला टँकरची (Pune Accident) धडक बसून झालेल्या अपघातात दोन जुळ्या मुलींचा मृत्यू झाला होता. तर त्यांचे आई-वडिल गंभीर जखमी झाले होते. सतीश कुमार झा (40) हे आपल्या 3 वर्षांच्या जुळ्या मुली आणि पत्नीसह दुचाकीवरून जात असताना विश्रांतीवाडी चौकात ट्रॅफिक सिग्नलजवळ थांबले होते. दिवा हिरवा होताच मागून येणाऱ्या पेट्रोल टँकरने मोटारसायकलला धडक दिली. श्रद्धा आणि साक्षी अशी मृत्यू झालेल्या दोघींची नावं होती. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. अपघाताच्या व्हिडिओंमध्ये ट्रॅकर चालकालाची चूक असल्याचं स्पष्ट दिसत होते. अपघात झाल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी धावपळ सुरु केली. चारही जणांना दवाखान्यात दाखल करण्यासाठी गडबड सुरु होती. मात्र, तेव्हाच दोघींचा करुण अंत झाल्याचं सगळ्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली.
इतर महत्वाची बातमी-