Pune Crime News : पुणे हादरलं! तू इथे का थांबलास? असं म्हणत टोळक्याकडून बेदम मारहाण अन् छातीत चाकू भोकसून हत्या
Pune Crime News : पुणे-मुंबई जुन्या महामार्गालगत अंधारात थांबलेल्या तरुणाला तू इथे का थांबलास असं म्हणत चार जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करत तरुणाच्या छातीत चाकू भोकसून हत्या केल्याची घटना उजेडात आली आहे.
पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या संख्येत सातत्याने (Pune Crime News) वाढ होत आहे. क्षुल्लक कारणावरुन हत्येच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. दरम्यान पुणे-मुंबई जुन्या महामार्गालगत अंधारात थांबलेल्या तरुणाला 'तू इथे का थांबलास?' अशी विचारणा करत चार जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. इतकंच नाही तर, तरुणाच्या छातीत चाकू भोकसून हत्या केल्याची घटना समोर आल्याने खळबळ माजली आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणाची चाकू भोसकून हत्या
कृष्णा शेळके असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास घडलेली आहे. कृष्णा इतर दोन मित्रांसह थांबला होता. यावेळी चार आरोपी आणि कृष्णासह त्याच्या मित्रांचा वाद झाला, यातूनच कृष्णाची हत्या करण्यात आली आहे. या प्रकारामुळे काही वेळ महामार्गाच्या परिसरात गोंधळ निर्माण झाला होता.
गुन्हेगारी कधी थांबणार?
काही दिवसांपूर्वी खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोळ्या झाडून एकाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली होती. मध्यरात्री अंदाजे 2 वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली होती. अनिल साहू (वय 35) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव होतं. मध्यरात्री झालेल्या खुनाच्या घटनेनं पुणे पुरतं हादरलं असून परिसरात भितीचं वातावरण पसरलं होतं. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत अनिल साहू घोरपडे पेठेतील (Ghorpade Peth) सिंहगड गॅरेज चौकात राहत होता. मध्यरात्रीच्या सुमारास अनिल साहू गाढ झोपेत होता, तेवढ्यात एक अज्ञात व्यक्ती तिथे आली आणि घरात शिरुन त्या व्यक्तीनं अनिल साहूवर एकापाठोपाठ एक तीन गोळ्या झाडल्या. अज्ञात व्यक्तीनं गोळ्या झाडल्या, त्यावेळी अनिल साहूचे कुटुंबियही घरातच होते. अज्ञात इसमानं गोळ्या झाडल्या आणि तिथून तात्काळ काढता पाय घेतला. हल्लेखोर पसार झाल्यानंतर अनिल साहू यांना रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी अनिल साहू यांनी तपासलं पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दुर्दैवानं अज्ञात हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळ्यांमुळे अनिल साहूचा आधीच मृत्यू झाला होता.
क्षृल्लक कारणावरुन हत्या
सध्या पुण्यात क्षुल्लक कारणावरुन होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. रोज नवे गुन्हे समोर येत आहेत. क्षुल्लक कारणावरुन भांडणं होतात, त्याच्या रागातून खून आणि हत्या करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याबरोबरच बलात्कार, सायबर क्राईम आणि लैंगिक छळांच्या घटनेत देखील वाढ होत आहे. कोयता गँग आणि चुहा गँग सक्रिय आहेत. त्यातील कोयता गँगने सध्या पुण्यात धुमाकूळ घातला आहे. त्यातच आता पुण्यात एकापाठोपाठ एक क्षृल्लक कारणावरुन हत्या केल्याचं समोर आलं आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :
Ulhasnagar Crime : उल्हासनगरमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगाराची हत्या, चार जणांना अटक