मी कंटेट क्रिएटर, पोलिसांनी गुन्हा मागे घ्यावा, मूळ प्रकरणातून सर्वांचं लक्ष दूर करु नये, फेक व्हिडिओ बनवणाऱ्या आर्यनची मागणी
Pune Car Accident Case : पुणे अपघात प्रकरण (Pune Car Accident Case) देशभरात तापल्यानंतर पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. पुणे अपघात प्रकरणी (Pune Car Accident Case) फेक व्हिडीओ बनवून चर्चेत आलेल्या आर्यनवर पुणे पालिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला होता.
Pune Car Accident Case : पुणे अपघात प्रकरण (Pune Car Accident Case) देशभरात तापल्यानंतर पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. पुणे अपघात प्रकरणी (Pune Car Accident Case) फेक व्हिडीओ बनवून चर्चेत आलेल्या आर्यनवर पुणे पालिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला होता. शिवाय त्याला पुणे पोलिसांत हजर होण्याची नोटीसही पाठवण्यात आली होता. दरम्यान, या सगळ्यावर गुन्हा दाखल झालेल्या आर्यनने प्रतिक्रिया दिली आहे. मी कंटेट क्रिएटर, पोलिसांनी गुन्हा मागे घ्यावा, मूळ प्रकरणातून सर्वांचं लक्ष दूर करु नये, अशी मागणी फेक व्हिडीओ बनवणाऱ्या आर्यनने केली आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात अल्पवयीन मुलाला सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. तर अल्पवयीन मुलाचे वडिल विशाल अग्रवाल न्यायालयीन कोठडीत आहेत. तर विशाल अग्रवाल यांचे वडिल सुरेंद्र अग्रवाल यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मूळ प्रकरणातून सर्वांचं दुर्लक्ष करता यासाठी हे सर्व सुरु आहे
आर्यन म्हणाला, मी माझ्या सोशल मीडियावरिल स्टोरीजला पॅरोडी व्हिडीओ लावले होते. मीडियावाल्यांनी ती चोरी करुन त्यांच्या पेजवर सर्क्युलेट केले. त्यांनी सांगितलं मी दोघांचा जीव घेणारा क्रिमिनल आहे. माझ्यावर सेक्शन '41 अ' , 509 आणि 294 च्या अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाचे सर्व लक्ष माझ्यावर केंद्रित करत आहेत. मूळ प्रकरणातून सर्वांचं दुर्लक्ष करता यासाठी हे सर्व सुरु आहे. तो करोडपतीचा मुलगा आहे, त्यामुळे हे सर्व करत आहेत. मी मध्यमवर्गीय मुलगा आहे. मला मारुन टाका, माझ्या जीवाची काही किंमत नाही. मी कोणाला व्यक्तीगत आई-बहिणीवरुन शिवी दिली नव्हती.
मी पॅरेडीमधून रॅप बनवला होता, पण यांनी मलाच क्रिमिनल बनवलं आहे
पुढे बोलताना आर्यन म्हणाला, मी पॅरेडीमधून रॅप बनवला होता. पण यांनी मलाच क्रिमिनल बनवलं आहे. त्या मुलाला एका दिवसात जामीन मिळतो, कारण त्याचे वडिल करोडपती आहेत. मला 25 तारखेच्या रात्री पुणे पोलिसांची नोटीस आली. 27 तारखेला पुणे पोलिसांत हजर होण्यास सांगण्यात आलं. माझ्या घरापासून पुण्याचा रस्ता 40 तास दूर आहे. लोव्हर क्लास फॅमिलीमधून येतो. माझ्याकडे कार नाही. तिथे यायला मला 40 हजार रुपये लागतील. मला तिथे जामिनासाठी पैसे द्यावे लागतील. काही माहिती मला तिथे क्रिमिनलच घोषित केलं जाईल. त्यानंतर सांगतील काळजीचं कारण नाही, पोर्शे कार प्रकरणातील आरोपी जेलमध्ये आहे.
इतर महत्वाच्या बातम्या