एक्स्प्लोर
रोकड, पेट्रोल पंप; लाचखोर उपजिल्हाधिकाऱ्याकडे कोट्यवधींची माया
यापुढे, मोरेची खुली चौकशी करण्यात येणार आहे. तसंच, दुपारनंतर मोरे आणि त्याच्या साथीदाराला कोर्टात हजर केलं जाणार आहे.
पुणे : पुण्यातील लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरेकडे लाखो रुपयांची रोकड, सोनं, पेट्रोल पंप आणि पुणे-सोलापूरमध्ये फ्लॅट असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. श्रीपती मोरेला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंधरा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली होती. एसीबीने गुरुवारी संध्याकाळी मोरेच्या कार्यालयातचही कारवाई केली.
त्यानंतर, मोरेच्या पुण्यातील घरात एसीबीने झडती घेतली. त्यात 38 लाख 33 हजार रुपयांची रोकड आढळून आली आहे. त्याचबरोबर, सोनं, पेट्रोल पंप आणि पुणे-सोलापूरमध्ये फ्लॅट असल्याची माहिती एसीबीच्या तपासात पुढे आली आहे. नातेवाईकांच्या नावे मोठ्या प्रमाणात बेनामी संपत्ती जमा केल्याचंही मोरेने एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या बेनामी मालमत्तांचा शोध एसीबी घेत आहे.
यापुढे, मोरेची खुली चौकशी करण्यात येणार आहे. तसंच, दुपारनंतर मोरे आणि त्याच्या साथीदाराला कोर्टात हजर केलं जाणार आहे.
श्रीपती मोरे पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक अकरा या पदावर कार्यरत होता. जमिनीच्या वादाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी मोरेने 25 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यातील पंधरा हजार रुपये स्वीकारताना त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement