Pune : पत्नीच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय लष्करी जवानाची आत्महत्या
आत्महत्या करण्यापुर्वी त्रासाबाबतचा एक व्हिडीओ त्या जवानानं तयार करून ठेवला होता. तसेच सुसाईड नोट देखील त्याने लिहून ठेवली आहे.
Pune : पत्नीच्या जाचाला कंटाळून पुण्यात (pune) एका 24 वर्षीय लष्करी जवानानं आत्महत्या केलेय. गोरख नानाभाऊ शेलार असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. भारतीय सेना दलात भरती नर्सींग असीस्टन्ट (Nursing assistant) या पदावर तो कार्यरत होता. आत्महत्येपूर्वी या जवानानं एक व्हिडीओ बनवला होता आणि एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली होती. पोलीसांकडून हे सर्व जप्त करण्यात आले आहे. या आधारे पोलिसांनी जवानाची पत्नी आणि सासरच्या मंडळींवरिोधात गुन्हा दाखल केलाय.
पोलीसांनी पत्नीसह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पत्नी अश्विनी युवराज पाटील, युवराज पाटील, संगिता युवराज पाटील, योगेश पाटील, भाग्यश्री पाटील (सर्व रा. शहादा, जि. नंदूरबार) यांच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत केशव पाटील (शेलार) यांनी तक्रार दिली आहे. वानवडी पोलिस आता या संपूर्ण घटनेचा चौकशी करत आहे आणि आरोपींना लवकरच अटक केला जाईल.
केशव पाटील (शेलार) यांनी तक्रार दाखल केली असून तक्रारीमध्ये त्यांनी म्हणटलंय की,16 फेब्रुवारी 2021 रोजी माझ्या भावाची पत्नी अश्विनी युवराज पाटील हिने 6 फेब्रुवारी रोजी पर्यंत माझ्या भावाला मानसिक त्रास दिला. पत्नी आणि सासरचे मंडळी गोरख याला त्रास देत होते. सोड चिठ्ठी दे आणि 15 लाख रुपये दे असे म्हणून त्याला त्रास दिला जात होता. या सततच्या मानसिक व शारिरीक छळाला कंटाळून त्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Pune: बोलणं सोडून दिल्याच्या रागातून अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला; आरोपी दोन तासांत गजाआड
- धक्कादायक! स्वत: च्या आजारपणाला कंटाळलेल्या मुलाने आईची हत्या करून केली आत्महत्या
- Crime News : प्रेयसीच्या मागण्यांना कंटाळलेल्या प्रियकराने केली हत्या; आरोपीला अटक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha