एक्स्प्लोर

धक्कादायक! स्वत: च्या आजारपणाला कंटाळलेल्या मुलाने आईची हत्या करून केली आत्महत्या

Sangli News : सांगलीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वत: च्या आजारपणाला कंटाळलेल्या मुलाने आईची हत्या करून आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे.

Sangli News :  स्वत: च्या आजारपणाला कंटाळलेल्या मुलाने आत्महत्या करण्यापूर्वी जन्मदात्या आईची हत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मृत्यूच्या पश्चात वृद्ध आईचा सांभाळ कोण करणार या चिंतेतून त्याने हत्या केली असल्याचे समोर आले आहे. सांगलीतील आष्टामध्ये ही मन सुन्न करणारी ही घटनासमोर आली आहे.  रतन रामचंद्र कांबळे (वय ८०) आणि शशिकांत रामचंद्र कांबळे (वय ४७) असे या दुर्दैवी मायलेकाचे नाव आहे.  

आष्टामध्ये शशिकांत कांबळे हे वृद्ध आई रतन तसेच पत्नी सुनीता व दोन मुलांसह अनेक वर्षापासून वास्तव्यास होते. शशिकांत याचे वडील रामचंद्र कांबळे व आई रतन कांबळे दोघेही प्राथमिक शिक्षक होते. शशिकांत कांबळे यांच्या वडिलांचे काही वर्षापूर्वी निधन झाले आहे. तर भाऊ, वहिनी व बहिणीचेही निधन झाले आहे. शशिकांत यांचे आष्ट्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर कापड दुकान आहे. मंगळवारी त्यांची पत्नी मुलांसह माहेरी गेली होती. दिवसभर घरी शशिकांत व त्यांची आई रतन हे दोघेच होते. शशिकांत यांना दम्याचा आजार आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासुन ते तणावाखाली होते. या नैराश्यातूनच त्यांनी कॉटवर विश्रांती घेत असलेल्या आईची नायलॉनच्या दोरीने गळा आवळून हत्या केली. यानंतर घरातील दुसऱ्या खोलीत जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान पत्नी सुनिता यांनी त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी फोन उचलला नाही. वारंवार प्रयत्न करुनही शशिकांत यांच्याशी संपर्क न झाल्याने सायंकाळी सुनिता घरी आल्या असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. 

शशिकांत यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी घटनास्थळी मिळाली. यामध्ये ‘माझ्या स्वतःच्या आजारपणाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे. आईला सांभाळण्यास कोणी नसल्याने मी आईला माझ्यासोबत घेऊन जात आहे.’असे लिहिले. या घटनेची माहिती मिळताच आष्टा पोलिसांचे पथक घटनास्थळी धावले. पोलीस निरीक्षक अजित सिद, सहाय्यक निरीक्षक रावसाहेब बाबर, सहाय्यक उपनिरीक्षक दीपक सदामते व पथकाने पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. घटनास्थळी नागरिकांची माेठी गर्दी झाली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे. 
 
महत्त्वाच्या बातम्या

Nashik News: मालेगावातील बंधाऱ्यावर रात्री हायव्होल्टेज ड्रामा, तरुणाचा टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न; आपत्ती व्यवस्थापनासह पोलिसांची धावपळ, मीडियाच्या टीमने संवाद साधला अन्...
मालेगावातील बंधाऱ्यावर रात्री हायव्होल्टेज ड्रामा, तरुणाचा टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न; आपत्ती व्यवस्थापनासह पोलिसांची धावपळ, मीडियाच्या टीमने संवाद साधला अन्...
Pune Crime : पोलीसच झाले दरोडेखोर! पुणे ग्रामीण पोलिसांचा कारनामा समोर, खंडणीनंतर टाकला दरोडा, सहा आरोपी फरार 
Pune Crime : पोलीसच झाले दरोडेखोर! पुणे ग्रामीण पोलिसांचा कारनामा समोर, खंडणीनंतर टाकला दरोडा, सहा आरोपी फरार 
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Embed widget