एक्स्प्लोर

Crime News : प्रेयसीच्या मागण्यांना कंटाळलेल्या प्रियकराने केली हत्या; आरोपीला अटक

Crime News : प्रेयसीकडून वारंवार होणाऱ्या मागण्यांना कंटाळून प्रियकराने टोकाचे पाऊल उचलले

Crime News :  तरुणाईला 'व्हेलेंटाइन डे' चे वेध लागले असताना दुसरीकडे धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीकडून वारंवार होणाऱ्या मागण्यांना कंटाळून प्रियकराने तिची हत्या केली. पालघर येथील वाघोबा घाटात प्रेयसीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी घटना उघडकीस आल्यानंतर काही तासांतच आरोपीच्या मुसक्या आवळल्या. 

दोन दिवसांपूर्वी पालघर मनोर महामार्गावरील वाघोबा घाटात कुजलेल्या अवस्थेत एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान होते. उपलब्ध असलेली माहिती आणि आढळलेल्या पुराव्याच्या आधारे आरोपींचा तातडीने शोध सुरू झाला. त्यानंतर अवघ्या 24 तासांत आरोपीला अटक करण्यात पालघर पोलिसांना यश आले. आरोपीकडून गुन्ह्याची कबुली देण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

पालघर पोलिसांना सांताक्रूझ येथील एक महिला बेपत्ता असून तशी तक्रार दाखल असल्याची माहिती मिळाली. या नंतर बेपत्ता महिलेचा प्रियकर झिको अन्सलीम मिस्कीत याला ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पालघरमध्ये आढळलेला मृतदेह हा सांताक्रूझ येथील पिंकी क्लिफोर्ड मिस्कवित्ता या तरुणीचा असल्याचं उघड झालं आहे.  प्रेयसीकडून वारंवार काही मागण्या होत असल्याने असल्याने त्याला कंटाळून आरोपीने ही हत्या केल्याची कबुली दिली आहे. आपला गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून आरोपीने तिचा मृतदेह पालघरच्या जंगलात आणून टाकला होता. या प्रकरणात पोलिसांनी प्रियकरासह आणखी एकाला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी पालघर पोलीस अधिक तपास करत आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani Crime: मतदार यादीत नाव टाकायचे 2,500 रुपये द्या! परभणीत लाच मागणारा BLO एसीबीच्या जाळ्यात
मतदार यादीत नाव टाकायचे 2,500 रुपये द्या! परभणीत लाच मागणारा BLO एसीबीच्या जाळ्यात
Nashik Ashram School : मुले फरशीवर झोपतात, तिथेच अभ्यास, रात्रीच्या अंधारात कपडे धुवावे लागतात; नाशिकच्या आश्रमशाळेची स्थिती, लाखोंचा निधी कुठे जातोय? 
मुले फरशीवर झोपतात, तिथेच अभ्यास, रात्रीच्या अंधारात कपडे धुवावे लागतात; नाशिकच्या आश्रमशाळेची स्थिती, लाखोंचा निधी कुठे जातोय? 
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Embed widget