एक्स्प्लोर
शिवसेनेला स्वबळावर निवडणूक लढणं शक्य नाही : पृथ्वीराज चव्हाण
शिवसेनेने आगामी निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याची घोषणा केली असली, तरी सक्ती, दबाव अशा वेगवेगळ्या प्रकारांचा भाजपकडुन वापर होईल, त्यामुळे शिवसेना स्वतंत्र लढू शकणार नाही, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
पुणे : शिवसेनेने आगामी निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याची घोषणा केली असली, तरी सक्ती, दबाव अशा वेगवेगळ्या प्रकारांचा भाजपकडुन वापर होईल, त्यामुळे शिवसेना स्वतंत्र लढू शकणार नाही, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
माजी खासदार संभाजीराव काकडे यांच्या गौरव सोहळ्यासाठी चव्हाण पुण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला, तरी भाजप त्यांना सोडणार नाही. शिवसेनेनेही कितीही प्रयत्न केला तरी त्यांनाही बाहेर पडता येणार नाही."
याबरोबरच भाजपविरोधात विरोधकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं. आणि विरोधी पक्ष एकत्र येऊ नये, यासाठी भाजपला प्रयत्न करावे लागतील. असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement