एक्स्प्लोर

PM Modi : "लोकमान्य टिळक पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा कारण…” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मराठीने जिंकली पुणेकरांची मनं

देशात  पुण्याला आणि  काशीला विशेष महत्त्व आहे. लोकमान्य टिळक पुरस्काराची रक्कम नमामि गंगा या प्रोजेक्टला देण्याचा निर्णय घेतला आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.

पुणे:  महारष्ट्राच्या भूमीला मी कोटी कोटी वंदन करतो, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) मराठीत आपल्या भाषणाची सुरुवात करताच पुणेकरांनी टाळ्या वाजवत कौतुक केलं. लोकमान्य टिळक पुरस्कार अत्यंत महत्त्वाचा आहे. पुण्याच्या पुण्यभूमीत येण्याची मला संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. पुणे ही टिळक, फुले, चाफेकर या वीरांची भूमी आहे.  लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak Award) पुरस्कार स्विकारताना मला  आनंद होत असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. 

टिळक पुरस्काराने माझी जबाबादारी वाढली

यावेळी त्यांचं स्वागत पुणेरी पगडी, सन्मानपत्र आणि  भेट देऊन करण्यात आलं. मोदींनीही यावेळी मराठीतून जनसागराशी संवाद साधत कार्यक्रमात अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. मोदी म्हणाले,  हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय अनुभव आहे.  एखादा पुरस्कार जेव्हा मिळतो तेव्हा जबाबादारी देखील वाढते. हा पुरस्कार मी 140 कोटी देशवासीयांना समर्पीत करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुरस्कार समारंभाला नेत्यांची मांदियाळी

राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे   उपस्थित होते. यावेळी त्यांचं स्वागत  पुणेरी पगडी भेट देऊन करण्यात आलं. मोदींनीही यावेळी मराठीतून जनसागराशी संवाद साधत कार्यक्रमात अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. 

टिळक पुरस्काराचा निधी नमामि गंगेला देण्याचा निर्णय 

ज्यांच्या नावात साक्षात गंगा नदीचे नाव आहे. अशा पुरस्काराची रक्कम मी नमामि गंगा या प्रोजेक्टला देण्याचा निर्णय घेतला आहे. देशात  पुणे आणि  काशीला विशेष महत्त्व आहे. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यलढ्याला वेगळे वळण दिले आहे. 

कोरोनाची लस तयार करण्यात पुण्याचे महत्त्वाचे योगदान

गेल्या नऊ  वर्षात भारतीयांनी  परिवर्तन करुन दाखवलं. भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे हे भारतीयांनी जगाले  दाखवलं. संकटकाळात भारताने वैज्ञानिकांवर विश्वास दाखवला, मेड इन इंडिया लस बनवली. कोरोनाची लस तयार करण्यात पुण्याचे महत्त्वाचे योगदान असल्याचे  पंतप्रधान मोदी म्हणाले.  

भाषणात सावरकरांचा उल्लेख

टिळकांकडे दूरदृष्टी होती. सावरकर तरूण होते होते त्यावेळीच टिळकांनी त्यांची क्षमता ओळखली.त्यांची इच्छा होती, सावरकरांनी परदेशात जाऊन शिक्षण घ्यावे. त्यानंतर इथे येऊन स्वातंत्र्य लढ्यात सहभागी व्हावे. लोकमान्य टिळक यांनी वीर सावरकर यांना बॅरिस्टर होण्यासाठी मदत केली, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. 

हे ही वाचा:

PM Narendra Modi Pune Visit Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचं भरभरुन कौतुक; म्हणाले जगभरात...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
Nashik Accident : दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
Santosh Deshmukh Case : दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange  Beed : त्यांना काही झालं तर धनंजय मुंडेंच्या टोळीचं जगण मुश्कील करेन,जरांगेंचा इशाराDhananjay Deshmukh Beed PC : ॲट्रॉसिटीचा गुन्हा का दाखल केला नाही..? धनंजय देशमुख यांचे खरमरीत सवालDhananjay Deshmukh Protest : जरांगेंनी हात जोडले, एसपींनी विनंती केली;अखेर 2 तासांनी देशमुख खाली आलेDhananjay Deshmukh Beed Protest:मनोज जरांगेंच्या विनंतीला प्रतिसाद, धनंजय देशमुख टाकीवरुन खाली उतरले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
Nashik Accident : दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
Santosh Deshmukh Case : दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त
धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त "आकां" चे सरताज देवेंद्र फडणवीसजी; सुषमा अंधारेंची शेलक्या शब्दात टीका
Gold Rate Today:एकीकडे रुपया कमजोर, शेअर बाजारात घसरण, दुसरीकडे सोने -चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या दर
रुपया कमजोर, बाजारात घसरण,गुंतवणूकदारांची सोने चांदीला पसंती, दरात तेजी, जाणून घ्या दर
Santosh Deshmukh : मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये  महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
Yohan Poonawalla : ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
Embed widget