Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांच्या प्रकृतीत मोठी सुधारणा! समर्थकांना दिलासा देणारा पहिला व्हिडिओ आला समोर; म्हणाले, 'निवडणूक अत्यंत महत्त्वाची...'
Prakash Ambedkar Health Update : प्रकाश आंबेडकरांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असल्याचे देखील दिसून येत आहे. त्याचबरोबर आज त्यांचा एक फोटो पक्षाकडून 'एक्स'वर पोस्ट करत. ते आता ठिक असल्याचं सांगण्यात आलं आहे.
पुणे : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यावरती अँजिओप्लास्टी यशस्वी झाल्याची माहिती काल(शुक्रवारी) समोर आली आहे. त्यांना पुढील 24 तास वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे, त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असल्याचे देखील दिसून येत आहे. त्याचबरोबर आज त्यांचा एक फोटो पक्षाकडून 'एक्स'वर पोस्ट करत. ते आता ठिक असल्याचं सांगण्यात आलं आहे.
वंचितच्या सोशल मिडियावर आंबेडकरांचा पहिला फोटो समोर
वंचितच्या सोशल मिडियावर आंबेडकरांचा पहिला फोटो समोर आला आहे. कोरा चहा (ब्लॅक टी), मारी बिस्किटे आणि वर्तमानपत्रे वाचून बाळासाहेब (प्रकाश) आंबेडकरांनी आपल्या दिवसाची सुरुवात अशी केली आहे. बाळासाहेबांना आज रुग्णालयातील आयसीयूमधून दुसऱ्या विभागात हलवण्यात येत आहे. आम्ही लवकरच बाळासाहेबांचा एक व्हिडिओ संदेश प्रसिद्ध करणार आहोत, असे एक्सवरील (पुर्वीचे ट्विटर) पोस्टमध्ये सांगण्यात आली आहे.
Black tea, marie biscuits and newspapers — this is how Balasaheb Ambedkar started his day.
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) November 2, 2024
Balasaheb would be transferred from the ICU to another area in the hospital, today.
We soon will be releasing a video message from Balasaheb. pic.twitter.com/e46aZim06U
तर फेसबुकवरती प्रकाश आंबेडकरांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, त्यामध्ये ते म्हणतात, 'मी सध्या आयसीयूमध्ये आहे. माझ्यावर अँजिओप्लास्टी आणि एन्जिओग्राफी झालेली आहे. डॉक्टरांनी अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे, निवडणुकीची सुरुवात झालेली आहे. ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. ओबीसीसाठी सुद्धा ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. विधानसभेनंतर ओबीसीचे आरक्षण थांबवलं जाणार आहे आणि दुसऱ्या बाजूला एससीच्या आरक्षणाची अंमलबजावणी होणार आहे. या दोन्हीच्या अनुषंगाने इलेक्शन महत्त्वाचे आहे. विधानसभेमध्ये आमदार निवडून आले तर त्या ठिकाणी आरक्षणावरचा हल्ला थांबवता येईल म्हणून सर्व कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना आरक्षणवादी जनतेला आव्हान करतोय की, वंचित बहुजन आघाडी म्हणजेच गॅस सिलेंडरच्या पाठीमागे उभे रहा आणि गॅस सिलेंडर चिन्हावरती आपला मूल्य मत द्याल अशी अपेक्षा करतो".
ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, दुसऱ्या बाजूस एससी, एसटी, ओबीसी आरक्षण वाचविण्याची ही अस्तित्वाची लढाई आहे. एससी, एसटी आरक्षणाच्या क्रिमीलेयरची अंमलबजावणी होणार आहे. या निवडणुकीत आपली सगळ्यांची जबाबदारी महत्वाची आहे. विधानसभेत आमदार निवडून आले, तर आरक्षणावरील हल्ला थांबवता येतो. आपण वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडरमागे उभे रहा, असे आवाहनही आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना, उमेदवारांना आणि आरक्षणवादी जनतेला केले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना गुरुवारी (31ऑक्टोबर) पहाटेच्या सुमारास पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावक अँजिओग्राफी करण्यात आली होती. यानंतर शुक्रवारी त्यांच्यावर 'अँजिओप्लास्टी' करण्यात आली. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.