Sushma Andhare : शिवसेनेचे चिलखत अन् मोठा भाऊ, सुषमा अंधारेंकडून संजय राऊतांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा तर पत्रातून निलम गोऱ्हेंवर जहरी टीका
Sushma Andhare Wishes Sanjay Raut : शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खासदार संजय राऊत यांना वाढदिवसाच्या आणि भाऊबीजेच्या खास पत्र लिहून शुभेच्छा दिल्या आहेत.शिवसेनेचे चिलखत अशी उपमा त्यांनी संजय राऊतांना दिली आहे.
पुणे : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना शिवसेना (Shiv Sena) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी वाढदिवसाच्या आणि भाऊबीजेच्या (Bhuabij) खास पत्र लिहून शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेनेचे चिलखत अशी उपमा त्यांनी संजय राऊतांना दिली आहे. त्यासोबतच लोकशाहीची प्रचंड आसक्ती असणारा माणूस सभोवतालची बेबंदशाही, हुकूमशाही झुगारून जिवाच्या आकांताने लढतो, अशा शब्दांत त्यांचा पत्रात उल्लेख केला आहे. तर, निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्यावर परखड शब्दांत निशाणा साधला आहे. सध्या सगळीकडे दिवाळी साजरी होत आहे. त्यात सगळेच राजकीय नेते एकमेकांना शुभेच्छा देताना दिसत आहे तर, विरोधकांवर तेवढ्याच जहरी टीका करतानादेखील दिसत आहे.
सुषमा अंधारेंनी पत्रात नेमकं काय लिहिलंय?
शिवसेनेचे चिलखत....
आपला वाढदिवस हा निष्ठावंत शिवसैनिकांसाठी "निष्ठा"दिवस आहे... !!
लोकशाहीची प्रचंड आसक्ती असणारा माणूस सभोवतालची बेबंदशाही, हुकूमशाही झुगारून जिवाच्या आकांताने लढतो. त्याची लढाई येणाऱ्या कित्येक पिढ्यांच्या सुरक्षित भवितव्याची चिंता आणि आशंका मांडते. ही समष्टी ची लढाई म्हणजे हुकूमशाही विरोधातला विद्रोह जणु. पण ज्यांना हा विद्रोह कळत नाही, जे समजुन उमजून सोयीस्कर रित्या आपला स्वार्थ साधण्यासाठी मौन बाळगतात.अशांसाठी कविश्रेष्ठ नामदेव ढसाळ दादा जे बिरूद वापरतात ते योग्यच. पण सत्तेसाठी जी हुजुरी करणारे , प्रसंगी आपल्या पाठीला रबर नाही कणा आहे हे विसरणारे माञ मग थयथयाट करतात. जसा गद्दारांवर आपण केलेल्या हल्ल्यानंतर काल काहींनी थयथयाट केला.
सर, माझ्यासाठी आपण कायम कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती.. सगळ्यांना सांभाळून घेणारा मोठा भाऊ असे वाटत राहिलात. पक्षप्रवेशनांतर आपल्याला भेटायचे तोच सुड भावनेतून झालेल्या ED च्या कारवाईमुळे आपल्याला भेटता आले नाही.आपल्या गैरहजेरीत माझ्या परीने खिंड लढवण्याचा प्रयत्न केला... पण आपला अत्यंत लढाऊ आणि कर्तबगार असा मोठा भाऊ काही काळासाठी सोबत नाही ही उणीव आम्हाला अधिक जबाबदारीने वागण्याचे भान देत होती.सामना च्या संपादकीय मधला रोखठोक बाणा आपल्या वागण्या जगण्यात ही आहे. हे आपले टीकाकार ही अमान्य करणार नाहीत.
सर, ज्यांना बहिण-भाऊ किंवा बाप-लेक अशी नातीच ज्ञात नाहीत किंवा त्यांच्या घरात तसे संस्कार च शिकवले नाहीत असे तद्दन बौद्धिक दिवाळखोर जेव्हा त्यांच्या कुटुंब, संघटना तथा नेतृत्वाच्या संस्काराचा विकृत परिचय देतात. अधून मधून जेव्हा ट्रोलींग, दबावतंत्र या मुळे माझे कुटुंबीय अस्वस्थ होते तेव्हा आम्ही आपला, आपल्या कुटुंबाचा त्यांनी मधल्या काळात जे दिव्य सोसलं त्याचा विचार करतो अन् मग कळतं, अरेच्य्या वर्षावहिनी किंवा तुमच्या आईंनी जे सोसलं त्यापुढे हे काहिच नाही.
मधेच नीलम गोऱ्हे आपली उपसभापती पदाची खुर्ची वाचवण्यासाठी गद्दारी करुन गेल्या. पण आपल्या गद्दारीचे लंगडे समर्थन करताना , मला राऊतांचे बोलणे पटत नव्हते असे सांगीतले तेव्हा माञ निष्ठावान शिवसैनिकांनी गोऱ्हे नावाचा शेवटचा बेईमान चिरा निखळला म्हणुन आनंदच व्यक्त केला हे उल्लेखनीय आहे.सर , ज्या त्वेषाने आपण गद्दार गँग आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या दांभिकतेवर तुटून पडताय जिवाच्या आकांताने हा मातोश्रींचा गढ वाचवण्यासाठी निकराची झुंज देत आहात ती केवळ अतुलनीय आहे. लावारिस पेड ट्रोलअर्स, स्लीपर सेल मधले गद्दार, एवढं धमकावून ही हा बधत कसा नाही हा विचार करुन हार मानणारी शाऊटींग ब्रिगेड, अन् मातोश्री ने भरभरून दिल्यावरही बेईमान होणारे स्वार्थी नेते या सगळ्यांना आपण तोंड देत आहात. आपला ऊर्जास्व लढा फलद्रूप होवो या सदिच्छासह पुनश्च एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
महत्वाच्या इतर बातम्या