एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तुकाराम मुंढेंच्या घराला 95 हजार रुपये भाडं, पुण्यात राजकारण तापलं
ते राहत असलेल्या घराचं भाडं 95 हजार रुपये आहे आणि हे भाडं तोट्यात असलेली पीएमपीएमएल भरत आहे.
पुणे : पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे हे राहत असलेल्या घराच्या भाड्यावरुन पुण्यात सध्या राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे. ते राहत असलेल्या घराचं भाडं प्रति महिना 95 हजार रुपये आहे आणि हे भाडं तोट्यात असलेली पीएमपीएमएल भरत आहे.
तुकाराम मुंढे बोट क्लब रोड या पॉश एरियात राहतात. मे 2017 मध्ये पीएमपीएमएलने या ठिकाणी सदनिका भाड्याने घेतली. फक्त मुंढे यांनाच राहण्यासाठी म्हणून, हा फ्लॅट भाड्याने घेण्यात आला. या सदनिकेचं क्षेत्रफळ तब्ब्ल 4500 चौरस फूट आहे आणि भाडं आहे 95 हजार रुपये.
शहरात महापालिकेच्या 8 हजार सदनिका आहेत. यात काही आलिशान घरे आहेत. त्यातील एखादं घर दिलं असतं, पण तसं काही झालं नाही. मुंढेंसाठी पीएमपीएमएल भरत असलेल्या घर भाड्याचा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे, पीएमपीएमएलचा तोटा.. आता एवढा तोटा असताना, जवळपास एक लाख रुपये भाडं भरणं योग्य नाही, असं मत काहींनी व्यक्त केलं आहे.
प्रत्येक वेळी मुंढे यांचं बोट पीएमपीएमएलच्या तोट्यावरच होतं. कामगारांना बोनस नाकारणं असो, पासमधील दरवाढ असो किंवा इतर काटकसर.. पीएमपीएमएलचा तोटा भरून काढण्यासाठीच हे सर्व सुरु असल्याची मुंढे यांची भूमिका आहे.
सुमारे लाख रुपये भाडं भरणाऱ्या मुंढे यांना ही काटकसर लागू नाही का? असा सवाल आता कामगार नेत्यांनी केला आहे. मुंढे प्रामाणिक अधिकारी आहेत. सचोटीने काम करतात. पारदर्शी कारभार करतात. भ्रष्टाचार त्यांना खपत नाही... मग, मुंढे यांना साडेचार हजार चौरस फुटांचा फ्लॅट आणि त्यासाठी एक लाख रुपये भाडं हे कसं पटतं? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केलाय.
मुंढे शासकीय अधिकारी आहेत. तर,पीएमपीएल ही पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मालकीची कंपनी. पीएमपीएमएलच्या अध्यक्षांसाठी जोपर्यंत स्वतंत्र घर उपलब्ध होत नाही, तोपर्यंत अशाच घरात राहावं लागणार आहे. मी काय किंवा अजून कोणी या पदावर आले तर त्यांना अशाच भाड्याच्या घरात राहावं लागेल, असं तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे.
कोणत्या परिसरात घर भाड्याने घ्यावं, यासाठी काही नियम नाहीत. पण, मुंढे यांना ज्या परिसरात घर हवं आहे, त्यासाठी जाहिरात देता अली असती. मात्र तसं न करता ते आलिशान घरात का राहतात, असाही प्रश्न उपस्थित केला जातोय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement