एक्स्प्लोर

Bopdev Ghat Incident: बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी तीन हजार मोबाइल नबंरची तपासणी; स्केच, सीसीटीव्ही अन् आत्तापर्यंत काय समोर आले अपडेट

Bopdev Ghat Incident: नराधम आरोपींकडे कोयता, चाकू अशी शस्त्रे होती, तसेच एका आरोपीच्या हातात बांबू होता. मित्राला ठार मारण्याची धमकी देऊन आरोपींनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे: पुण्यातील बोपदेव घाटात गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास फिरण्यासाठी गेलेल्या टेबल पाॅईंट परिसरात रात्री तरुणी आणि तिचा मित्र यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यावेळी ३ आरोपी त्याठिकाणी आले. त्यांनी तरुणी आणि तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवला. तरूणाला मारहाण केली, त्याचा शर्ट काढला. शर्टने तरूणाचे हात बांधले, त्याच्याच पॅन्टचा पट्टा काढून त्याचे पाय बांधले. तरुणाला एका झाडाला बांधून आरोपींनी परराज्यातून पुण्यात शिकायला आलेलल्या त्या २१ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे. या ३ नराधम आरोपींकडे कोयता, चाकू अशी शस्त्रे होती, तसेच एका आरोपीच्या हातात बांबू होता. मित्राला ठार मारण्याची धमकी देऊन आरोपींनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. 

या प्रकरणात आत्तापर्यंत काय काय अपडेट आले समोर

पोलिसांकडून स्केच प्रसिद्ध

या प्रकरणातील संशयित आरोपीचे स्केच कोंढवा पोलीस स्टेशनने प्रसिध्द केले आहे. याबाबत काही माहिती मिळाल्यास खालील त्वरित संपर्क साधावा असे पोलीसांनी आवाहन केले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन श्री विनय पाटणकर,संपर्क क्रमांक : 8691999689 पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट 5 श्री.युवराज हांडे संपर्क क्रमांक : 8275200947 /9307545045 किंवा नियंत्रण कक्ष पुणे शहर 020-26122880 यावर त्वरित संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

शहर पोलिसांच्या तब्ब्ल 25 टीम वेगवेगळ्या दिशेने या आरोपींचा शोध घेत आहेत. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक डाटा यांच्या मदतीने पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र, मोबाईल फोनला रेंज नसलेला परिसर आणि तब्बल दहा किमी अंतरापर्यंत सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांच्या तपासात अडचण निर्माण झाली आहे. बोपदेव घाटाच्या सासवडच्या बाजूला तीन संशयिताच एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटना घडल्याच्या वेळेनंतर साधारण 15 मिनिटांनी हे संशयित पुढे जाऊन थांबले असले असावेत असा संशय पोलिसांना आहे. या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

पोलिसांनी काय सांगितलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा आणि मुलगी पुण्यात कॉलेजमध्ये शिकत होते. पिडित तरूणी 21 वर्षांची आहे. बोपदेव घाटात ते चक्कर मारण्यासाठी आले होते. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात लोक बोपदेव घाटात आले, त्यांनी दोघांना धमकावलं. मुलाला त्यांनी मारहाण केली. त्यानंतर मुलाला त्याच्या शर्ट आणि बेल्टने झाडाला बांधून ठेवलं. अज्ञात तिघांनी मुलीवर अत्याचार केले.या घटनेची माहिती आपल्याला पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास मिळाली. या प्रकरणात पथकं कामाला लावली आहेत. अनेक लोकांची चौकशी सुरु आहे. एकुण 3 मुलं आहेत त्यांचा शोध सुरु आहे. मुलगी बाहेर राज्यातील आहे. 

प्रकरणात तीन हजार मोबाइल क्रमांकाची तपासणी 200 हून सराईतांची चौकशी

या सामूहिक बलात्कार प्रकरणात तीन हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांकडून काढण्यात येत आहे. त्याआधारे पोलिसांकडून तांत्रिक तपासण्याचे काम सुरू आहे. पोलिसांकडून दोनशेहून अधिक सराईतांची चौकशी करण्यात येणार आहे. गेल्या पंधरा दिवसांत बोपदेव घाटमार्गे गेलेल्या तीन हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांकडून गोळा करण्यात आली आहे. बोपदेव घाटापासून जाणाऱ्या ७० ते ८० किलोमीटरपर्यंत सीसीटीव्ही मिळवण्यात येणार आहे. दोनशेहून अधिक सराइतांची चौकशी सुरू करण्यात आली आहे, या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget