एक्स्प्लोर

Pune News : मुंबईनंतर आता पुण्यातही मराठी पाट्या; पाट्या मराठीत करण्याचे महापालिकेचे आदेश

दुकाने आणि विविध अस्थापनांच्या पाट्यांचा विषयाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबईनंतर आता पुण्यातही दुकाने आणि विविध अस्थापनांच्या पाट्या मराठी बघायला मिळणार आहे.

Pune News: पुणे : दुकाने आणि विविध अस्थापनांच्या पाट्यांचा विषयाने चांगलाच जोर (Marathi Pati) धरला आहे. मुंबईनंतर आता पुण्यातही दुकाने आणि विविध अस्थापनांच्या पाट्या मराठी बघायला मिळणार आहे. पुणे महापालिकेने दुकाने आणि अस्थापनांवरील पाट्या मराठीमध्ये करण्यासाठी आदेश काढले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी न करणार्‍यांवर कारवाई होणार, असा इशारा महापालिकेने व्यावसायिकांना दिला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांत सर्व पाट्या दुकानदारांनी मराठी स्थानिक भाषेत करावेत, असे आदेश दिले होते. त्याची मुदत 25 नोव्हेंबर रोजी संपली. त्यानंतर मुंबईतील अनेक परिसरातील इंग्रजी पाट्या हटवून मराठी पाट्या लावण्यात आल्या. त्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत सगळ्यांना आवाहन केलं. त्यानंतर ज्या ठिकाणी इंग्रजी पाट्या दिसल्या त्याठिकाणी आंदोलन केलं होतं. हेच पाहून मनसे कार्यकर्त्यांनी पुण्यातीलही दुकाने आणि अस्थापनांच्या पाट्या मराठीमध्ये करण्याची मागणी काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांकडे केली होती. तसेच, न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

याच मागणीला आता यश आलं आहे. महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाने मराठी पाट्या संदर्भातले आदेश काढले आहे. या संदर्भातील सगळी माहिती प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला आदेशाची अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला आहे. आणि अंमलबजावणी न करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा ईशारा दिला आहे.

दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

कोर्ट कचेरीत पैसा खर्च करण्यापेक्षा मराठी पाट्यांसाठी पैसे खर्च करा, अशी कानउघडणी करत सर्वोच्च न्यायालयाने मुंबईसह राज्यातील व्यापारी संघटनेला दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. येत्या दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांत ग्राहकांना आकर्षित करण्याची ही नामी संधी आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत मुंबईसह राज्यभरातील सर्व दुकानं आणि आस्थापनांवर मराठी पाट्या दिसण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे, असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं. 

'मराठी पाट्या' या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) गेली कित्येक वर्ष जो संघर्ष केला त्याला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने एक मान्यताच मिळाली, असं राज ठाकरे म्हणाले. तसंच दुकानदारांनी पण नसत्या भानगडीत पडू नये आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा आणि इथलं सरकार लक्ष ठेवेल, कारवाई करेल ती करेल, पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं पण लक्ष असेल हे विसरु नका, असा इशाराही त्यांनी दिला होता. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

अजित पवार गटाचं आज कर्जतमध्ये दोन दिवसीय शिबीर, अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करणार

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा धुमाकूळ, शेती पिकांना मठा फटका, शेतकरी चिंतेत
राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा धुमाकूळ, शेती पिकांना मठा फटका, शेतकरी चिंतेत
धक्कादायक! बारामतीत चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग, पार्किंगमधील चार दुचाकी जळून खाक, आगीचं कारण अस्पष्ट
धक्कादायक! बारामतीत चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग, पार्किंगमधील चार दुचाकी जळून खाक, आगीचं कारण अस्पष्ट
राज्यसभेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीकडून कोणाचे नाव? सुनेत्रा पवारांनी बारामतीतून स्पष्टच सांगितलं
राज्यसभेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीकडून कोणाचे नाव? सुनेत्रा पवारांनी बारामतीतून स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shashi Tharoor: 'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
R. Ashwin on Suryakumar Yadav: जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता..' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
Shreyas iyer: और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला
और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला
मोठी बातमी! एसीबीच्या एकाच दिवशी दोन धाडी, जालन्यात चक्क तहसीलदार रंगेहात जाळ्यात, 6 लाखांची घेतली लाच
मोठी बातमी! एसीबीच्या एकाच दिवशी दोन धाडी, जालन्यात चक्क तहसीलदार रंगेहात जाळ्यात, 6 लाखांची घेतली लाच
अभिजीत दीपके दिल्लीत, जंतरमंतरवरील कॉकरोच पार्टीच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया...
अभिजीत दीपके दिल्लीत, जंतरमंतरवरील कॉकरोच पार्टीच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया...
Embed widget