PM Modi: 'आधीच्या सरकारमुळे महाराष्ट्रासह देशाचं मोठं नुकसान'; PM मोदींनी पुणे मेट्रो लोकार्पण कार्यक्रमातून डागली तोफ
PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे पुण्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले आहे. यावेळी बोलताना मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे पुण्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले आहे. २६ सप्टेंबर रोजी निश्चित झालेला मोदींचा पुणे दौरा पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे माझे देखील नुकसान झाले असं मोदींनी म्हटलं आहे, तर यावेळी बोलताना त्यांनी पुण्याचा सर्वांगिण विकास करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर विरोधकांच्या कामाच्या गतीमुळे महाराष्ट्र राज्यासह देशाचं मोठं नुकसान झालं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
आज डिस्ट्रिक्ट रोड ते स्वारगेटपर्यंत मेट्रो सुरू होत आहे. स्वारगेट ते कात्रज सेक्शनचं उद्घाटन झालं आहे. सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकांची पायाभरणी झाली. आपण वेगाने पुढे जात आहोत. आज विठ्ठलाच्या आशीर्वादाने त्यांच्या भक्तांनाही भेट मिळाली आहे. सोलापूरला थेट एअर कनेक्टिविटीशी जोडण्यासाठी एअरपोर्टला अपडेट करण्याचं काम केलं आहे. प्रवाशांसाठी नवीन सुविधा केली आहे.त्यामुळे देश विदेशातून विठ्ठलांच्या भक्तांना चांगली सुविधा मिळेल. विठ्ठ्लाच्या दर्शनासाठी लोकं थेट सोलापूरला येतील. व्यापार व्यवसाय आणि पर्यटनालाही गती मिळणार आहे. महाराष्ट्रातील जनतेला या विकास कामासाठी अभिनंदन करतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
पुढे बोलताना नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले, पुणे ज्या गतीने पुढे जात आहे, त्याच गतीने सर्व सोयी सुविधा वाढल्या पाहिजे या दृष्टीने प्रयत्न केले गेले पाहिजेत पुण्याचा मोठ्या गतीने विकास होतो आहे, महायुती याच अनुषंगाने मोठे काम करत आहेत, आता सुरू असलेला विकास खूप आधी येणं अपेक्षित होतं. मात्र आधी प्लॅनिंग आणि विकासाला विलंब झाला, जर अशा कोणती योजना बनली तर ती फाईल वर्षोंवर्षे तशीच धुळखात पडत होती, २००२ मध्ये या मेट्रोची चर्चा होती, मात्र आमचं सरकार आलं त्यानंतर याला चालना मिळाली, आज एका जुन्या कामाचा लोकार्पण केलं, तर आजच एका कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आहे. जुनं सरकार ८ वर्षात एका एक पिलर उभं करू शकली नव्हती, मात्र, आमच्या सरकारने तुमच्या सेवेत मेट्रो आणली, असं म्हणत मोदींनी विरोधकांना लक्ष्य केलं आहे. राज्याच्या हिताच्या दृष्टीने राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगलं काम करत आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिगत मेट्रो मार्गाचं लोकार्पण
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग (Pune Metro) आजपासून प्रवाशांसाठी सुरू झाला आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा मेट्रो मार्गाचं पंतप्रदान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं आहे. ऑनलाईन पध्दतीन नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी या मेट्रोला (Pune Metro) हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar) हे पुण्यात उपस्थित आहेत





















