![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत पुन्हा गोळीबार! आणखी एक हत्या, भीषण घटना सीसीटीव्हीत कैद
Pimpri Chinchwad Firing : सहा दिवसात तीन हत्यांच्या घटनांनी पिंपरी चिंचवड हादरलं आहे. काल रात्री पुन्हा गोळीबाराची घटना घडली असून नागेश कराळे (Nagesh Karale) नामक युवकाचा मृत्यू झाला आहे.
![पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत पुन्हा गोळीबार! आणखी एक हत्या, भीषण घटना सीसीटीव्हीत कैद Pimpri Chinchwad Firing Shooting again in Khed horrific incident captured on CCTV पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत पुन्हा गोळीबार! आणखी एक हत्या, भीषण घटना सीसीटीव्हीत कैद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/24/748840a23249d4854219d5632cd0721a_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pimpri Chinchwad Firing : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आणखी एकाची हत्या झाली आहे. खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव मध्ये एकावर पाच ते सहा गोळ्या झाडण्यात आल्यात. ही गोळीबाराची घटना सीसीटीव्ही देखील कॅमरामध्ये कैद झाली आहे. यात नागेश कराळे (Nagesh Karale) नामक व्यक्तीचा यात जागीच मृत्यू झाला आहे. काल रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. चारचाकी वाहनांमधून आलेल्या तीन मारेकऱ्यांनी नागेश कराळेवर हा गोळीबार केला.
नागेश कराळे स्वतःच्या वाहनात बसताच हे मारेकरी तिथं पोहचले आणि त्यांनी नागेश कराळे यांच्यावर पिस्तूलमधून एकापाठोपाठ गोळ्या झाडून त्याची हत्या केली. जुन्या वादातून ही हत्या झाला असल्याचा प्राथमिक अंदाज चाकण पोलिसांनी लावला आहे.
गेल्या सहा दिवसांत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ही तिसरी हत्या आहे. शनिवारी पिंपळेगुरवमध्ये भरदिवसा एकावर गोळीबार झाला. बुधवारी तळेगावमध्ये अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हाथोड्याने प्रहार करून हत्या करण्यात आली आणि गुरुवारी पुन्हा हा गोळीबार झाला. त्यामुळे आयर्नमॅन म्हणून ओळख असणारे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नेतृत्वात कायदा सुव्यवस्था राम भरोसे असल्याचं चित्र आहे.
गेल्या शनिवारी पिंपळेगुरव परिसरात भरदिवसा गोळीबार झाला होता. तेव्हा योगेश जगताप नावाच्या गुन्हेगाराची हत्या झाली. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला होता. गोळीबार करणारे अज्ञात हे दुचाकीवरून आले होते. पिंपळेगुरवमध्ये सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले होते. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)